*श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे किशोरवयीन मुला-मुलींसाठीची कार्यशाळा संपन्न…*

Uncategorized

प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात शुक्रवार दिनांक ४ऑक्टो.२०२४ रोजी किशोरवयीन मुला-मुलींसाठीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी साद मानस क्लिनिकच्या संस्थापक व मानसशास्त्र अभ्यासक मा. समीक्षा संध्या मिलिंद व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या.
आलेल्या पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी केले. तसेच त्यांचा परिचय देखील करून दिला.
या कार्यशाळेत मुलांशी संवाद साधताना समीक्षा मॅडम यांनी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना किशोरवयीन अवस्थेत होणारे शारीरिक व मानसिक बदल आणि याचा अभ्यासावर होणारा परिणाम व त्यावरील उपाय याविषयी समुपदेशन केले. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचा मोबाईलचा अतिरेकी वापर होतो आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध समस्या वा त्यावरील उपाय ,तसेच गुड टच बॅड टच याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुन्ह्यांचे विविध प्रकार व पोक्सो कायदा व त्याचे गंभीर स्वरूप याबद्दल देखील विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात आली.. अविचाराने घेतलेल्या भावनिक निर्णयाचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात हे विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले. विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांचे शंका निरसनही करण्यात आले.
आपल्या प्रश्नांना मिळालेली योग्य व समाधानकारक उत्तरे यांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झालेले समाधान यावरून कार्यक्रमाची यशस्विता लक्षात आली.
विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेबाबत संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैया काकडे दे.,उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे सर, मानद सचिव मा. श्री. मदनराव काकडे दे.यांनी समाधान व्यक्त केले.