निंबूत येथील भैरवनाथ देवस्थान मंदिरास ब वर्ग दर्जा प्राप्त. सतीश राव काकडे यांच्या पाठपुराव्याला यश.

Uncategorized

प्रतिनिधी.

बारामती तालुक्यातील निंबूत हे यात्रेच्या कुस्ती आखाड्यामुळे नेहमीच चर्चेत असते. या आखाड्यामध्ये दरवर्षी परराज्यातील मल्ल आपले नशीब आजमावण्याकरता येत असतात. याच निंबूत मधील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना ब वर्ग अंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यापूर्वी नींबूत येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यास क वर्ग दर्जा प्राप्त होता.
ब वर्ग प्राप्त झाल्यामुळे नींबूत येथील मंदिराचा कायापालट करण्यासाठी ही मोठी मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. नींबूत येथील भैरवनाथ देवस्थान मंदिरास व इतर मंदिरांच्या दुरुस्तीसाठी जवळपास तीन कोटीचा निधी ब वर्ग मिळाल्यामुळे उपलब्ध झाला असल्याची माहिती श्री सतीश राव काकडे यांनी यावेळी बोलताना दिली
या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे. यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे ट्रस्टच्या माध्यमातून सांगितले जात आहे. ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे नींबूत येथील ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला   तसेच कागदोपत्री सर्व गोष्टींचा पाठपुरावा श्री सतीश राव काकडे यांनी केल्यामुळे निंबूत येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट नींबूत ब वर्ग दर्जा मिळवण्यासाठी पात्र झाले असल्याचे देखील बोलले जात आहे. यामुळे नींबूत येथील ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासन. व श्री सतीश राव काकडे यांचे आभार व्यक्त केले.