• Home
  • क्राईम
  • अटक न करण्यासाठी लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड
Image

अटक न करण्यासाठी लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड

प्रतिनिधी

वॉरंट बजावण्यात आल्यानंतर अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. शरद दशरथ कणसे असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरोधात कोलकाता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी वॉरंट बजावले आहे. संबंधित वॉरंटबजावण्यासाठी उपनिरीक्षक शरद कणसे याला देण्यात आले होते. यामध्ये तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला अटक न करण्यासाठी कणसेने २५ हजार रुपयांची लाच मागितली. सुरवातीला ५ हजार रुपये त्याने घेतले. त्यानंतर उर्वरीत २० हजार रुपयांसाठी त्याने तक्रारदाराकडे तगादा लावून अटक करण्याची धमकी दिली.

तक्रारदाराने तक्रार दिली. त्यानंतर सापळा लावून कणसेला लाच घेताना पकडले. याप्रकरणी कणसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अमोल भोसले तपास करत आहेत.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026