• Home
  • माझा जिल्हा
  • वारजे पुलाजवळ गॅस टँकर उलटला, चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा
Image

वारजे पुलाजवळ गॅस टँकर उलटला, चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा

प्रतिनिधी

मुंबई-बंगळुरू बाह्यवळणमार्गावरील वारजे पुलाजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना रविवारी सकाळी घडली. टँकर उलटल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अखेर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास उलटलेला ठँकर क्रेनच्या सहायाने बाजूला काढण्यात आला. त्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

इण्डेन कंपनीचा गॅस टँकर मुंबईहून साताऱ्याकडे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाला होता. निघालेला होता. वारजे पुलाजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर टँकर उलटला.सुदैवाने समोरुन वाहन येत नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. टँकरचालकासह मदतनीस सुखरुप बाहेर पडले. मात्र, या घटनेनंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. टँकर आकाराने मोठा असल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्याने या भागात कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, टँकरमध्ये गॅस असल्याने बाजूला काढण्यासाठी अडचण आली. सुरक्षेच्या उपाययोजना करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. बाह्यवळण मार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टँकर बाजूला काढण्यासाठी पाच क्रेन मागविण्यात आल्या. अखेर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास टँकर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. टँकर सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. टँकर नेमका कसा उलटला, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटल्याची शक्यता वारजे पोलिसांनी व्यक्त केली.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026