निंबुत येथे संविधान दिन उत्साहात साजरा.

Uncategorized

प्रतिनिधी.
सकाळी नऊ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथे मिलिंद तरुण मंडळ निंबुत यांच्यावतीने संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
देशाने संविधान स्वीकारल्याचे 75 वर्ष आज पूर्ण झाले. महामानव डॉ. बॅरिस्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी निंबुत गावचे उपसरपंच अमरदीप चंद्रशेखर काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार छगनराव काकडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कुमारी ऋतुजा मधुकर बनसोडे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
भीमराव बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत संविधानाबद्दलची माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी निंबुत गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत निंबूत ग्रामपंचायत गरदडवाडी या ठिकाणी देखील संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मिलिंद तरुण मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी निंबुत ते पाडेगाव बौद्ध विहारा पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
यावेळी नींबूत तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.