• Home
  • क्राईम
  • विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा; दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
Image

विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा; दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विद्यापीठाकडून दोन विद्यार्थ्यांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्‍या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक पाचमधील एका खोलीत विद्यार्थी गांजा ओढत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने सुरक्षा विभागाकडे केली. त्यानुसार सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनेची पाहणी केली. विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनुसार सुरक्षा विभागाने तक्रारदार विद्यार्थी आणि गांजा ओढत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे म्हणाल्या, की वसतिगृहाचे गृहपाल यांच्याकडून संबंधित प्रकरण पोलिसांकडे दाखल करण्यात आले. पुढील कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये प्रवेशित नाही.

विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडण्याची ही दुसरी वेळ आहे. तीन महिन्‍यांपूर्वीही असाच प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून विद्यापीठात आंदोलने करण्यात आली होती.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026