बारामती ! जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकरी बांधवांना कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

मंडळ कृषी अधिकारी कार्यालय वडगाव निंबाळकर यांचे तर्फे बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी , व सदोबाचीवाडी हद्दीतील श्री विशाल धुमाळ यांचे शेतामध्ये ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक राबविण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांना कृषि अधिकारी श्री हिंदूराव मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून ड्रोनद्वारे फवारणीचे महत्त्व सांगितले. यावेळी विशाल धुमाळ यांनी ड्रोनद्वारे फवारणीचे अनुभव सांगण्यात आले .

५ डिसेंबर जागतिक मृदा दिनानिमित्त मृदसंधारणा संदर्भात मंडळ कृषी अधिकारी श्री मोरे व श्री माने यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. माती परिक्षण, जमिनीचे आरोग्य, सुपिकता निर्देशांक व त्या आधारे खतांच्या शिफारशी याबाबत कृषि पर्यवेक्षक प्रविण माने यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाला वडगाव निंबाळकर येथील मंडळ कृषि अधिकारी हिंदूराव मोरे, कृषि पर्यवेक्षक प्रताप कदम कृषि सहाय्यक मिथुन बोराटे व कृषी मंडळ मंधील सर्व कृषि सहाय्यक उपस्थित होते. याचबरोबर शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती . कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक मिथुन बोराटे यांनी केले होते .