प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर बसस्थानक येथे निरा बारामती रोडवर रोडची साइडपट्टी खचल्याने रोडवर मोठा खड्डा पडला आहे . हा खड्डा पडल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे . याठिकाणी बसस्थानक असल्याने एस टी बसची वाहतूक सतत चालू असते प्रवाशी बसची वाट पाहत बसस्थानक याठिकाणी उभे असतात . यामध्ये याठिकाणी अपघात होण्याचे जास्त शक्यता आहे. या खड्याबद्दल संबंधित प्रशासनाला ग्रामस्थांकडून वारंवार माहिती दिली असताना देखील संबंधित प्रशासनाचे या खड्याकडे दुर्लक्ष्य केले जात आहे ?. जर भविष्यात याठिकाणी अपघात झाला तर याला जबाबदार कोण ? .
सोमेश्वर व माळेगाव साखर कारखाना चालू झाला आहे नीरा बारामती रोडवरून बैलगाडी व उसाचे ट्रॅक्टर ची रहदारी रात्र दिवस चालू असते . या वाहतुकीत जर हा खड्डा दिसला नाही आणि अपघात झाला तर याला जबाबदार कोण ? याची जिम्मेदारी कोण घेणार ? अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे . याठिकाणी बसस्थानक असल्याने व हा रस्ता सतत वाहतुकीचा आहे या खड्यामुळे भरपूर प्रमाणात गाडी खड्यामध्ये जोरात आदळल्या जातात यामुळे कोणाचा अपघात झालाका याची भीती सतत नागरिकांच्या मनात बसलेली आहे . हा खड्डा लवकरात लवकर संबंधित प्रशासनाने भरून घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.