प्रतिनिधी – फिरोज भालदार
मंगळवार दिनांक १० डिसेंबर २०२४ रेजी एम न्यूज मराठीचे प्रतिनिधी यांच्याकडून निरा बारामती रोड येथील वडगाव निंबाळकर बसस्थानक समोरील असलेल्या धोकादायक खड्याबद्दल बातमी प्रसारित करण्यात आली होती . हा खड्डा धोकादायक असल्याने व भविष्यात या खड्ड्यामुळे अपघात होऊन जिवीत हानी होऊ नये एखादा अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्याअगोदरच उपाययोजना कराव्यात या हेतूने एम न्यूज मराठीचे प्रतिनिधी कडून बातमी प्रसारित करण्यात आली . याची दखल घेत संबंधित प्रशासनाकडून हा खड्डा बुजवण्यास सुरवात केली आहे .
सदरचा रस्त्यामधील खड्डा बुजवत असल्यामुळे भविष्यात एखादे कुटुंब उध्वस्त होण्यापासून नक्कीच वाचेल.
अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.