मुख्य मजकुरावर जा
Thursday, 17 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 11 January 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

खंडोबाची वाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी संतोष धायगुडे यांची बिनविरोध निवड.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
January 11, 2025 1 मिनिट वाचन 8,517 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

 प्रतिनिधी.

ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी येथे सन 2021 साली श्री सोमेश्वर जनशक्ती पॅनेलचे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले होते ठरल्याप्रमाणे प्रथम वर्षं सौ भाग्यश्री धनंजय गडदरे, दोन नंबर श्री अजित विलास लकडे,तीन नंबर सौ ऋती महेश मदने यांची सरपंच पदी निवड झाली होती, सौ ऋती महेश मदने यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने निवडणूक निर्णय अधिकारी कंरजेपुल सर्कल अजित मोहिते भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत श्री संतोष उत्तम धायगुडे यांचा एकच अर्ज आल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली यावेळी श्री लक्ष्मणराव गोफणे संचालक सोमेश्वर कारखाना, श्री वसंतराव मदने माजी संचालक सोमेश्वर कारखाना, श्री धनंजय गडदरे युवा नेते खंडोबाचीवाडी हे पॅनेलप्रमुख उपस्थित होते, उपसरपंच मंगल ठोंबरे, सदस्या मनिषा फरांदे ग्रामस्थ रामभाऊ लोंखडे, हनुमंत लकडे खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच, सदस्य, सोसायटी माजी चेअरमन,व्हा चेअरमन, सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी निवडणूक कामे निंबुत तलाठी जयश्री तनपुरे मॅडम, ग्रामविकास अधिकारी सीमा गावडे, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच पदी निवड झाल्याबद्दल श्री संतोष उत्तम धायगुडे यांनी गावांचे आभार मानले व गावाचा विकास करेल असे सांगितले व आदर्श गाव करील हि ग्वाही दिली

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख