• Home
  • माझा जिल्हा
  • करंजे येथे ‘सोमेश्वर प्रीमियर लीग’ पर्व चौथे उत्साहात संपन्न. बारा संघांचा समावेश ; प्रथम क्रमांक श्रीनाथ टायगर वडगाव यांनी पटकावला.
Image

करंजे येथे ‘सोमेश्वर प्रीमियर लीग’ पर्व चौथे उत्साहात संपन्न. बारा संघांचा समावेश ; प्रथम क्रमांक श्रीनाथ टायगर वडगाव यांनी पटकावला.

प्रतिनिधी.

सोमेश्वरनगर-ग्रामीण भागातल्या युवक तरुणांना खेळण्याचे एक व्यासपीठ मिळावं सध्याची तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये आरोग्यदायी राहावी म्हणून सोमेश्वर परिसरातील युवकांच्या संकल्पनेतून सोमेश्वरनगर करंजे येथे गलांडे पाटील मैदान तयार केले याचा फायदा सर्वांनाच होत आहे.. या ठिकाणी आठवड्यातील रविवार सुट्टी दिवशी मोठे क्रिकेट सामने भरतात यामध्ये बारामती तालुक्यातील स्पर्धक खेळाडू येथे येत असतात. दरवर्षीप्रमाणे बारामती पश्चिम तालुक्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंसाठी भरण्यात आलेल्या सोमेश्वर प्रीमियर लीग पर्व चौथे करंजे येथे उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेसाठी बारा संघांनी नोंद केली होती आयोजित क्रिकेट स्पर्धा बुधवार दि २९ जानेवारी सुरुवात तर या स्पर्धेची रविवारी दि.२ तारखेला सांगता झाली . प्रथम दुतीय व तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या बक्षिस वितरण कार्यक्रम उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी सन्मान चिन्ह देत करण्यात आला. यावेळी बारामतीच्या पश्चिम भागातील आलेल्या खेळाडू तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवार रोजी विशेष मॅच म्हणून पोलीस पत्रकार क्रिकेट सामना होता यामध्ये पत्रकार संघाने अधिकची धावसंख्या देत पोलीस संघाला आव्हान दिले परंतु पोलीस संघाने दिलेली धावसंख्या पूर्ण करत विजय मिळवला विजयानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देत पोलीस संघाला गौरविण्यात आले.

आयोजित ‘सोमेश्वर प्रीमियर लीग’ पर्व चौथे मध्ये विजेते झालेले संघ प्रथम क्रमांक श्रीनाथ टायगर वडगाव, द्वितीय क्रमांक ईशान स्मॅशर्स करंजे ,तृतीय क्रमांक डी एस पॅंथर मुरूम, चतुर्थ क्रमांक डीजे लाईन्स मोरगाव हे संघ बक्षीस पात्र ठरले प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार रुपयांचे बक्षीस नवनाथ उद्योग समूह अध्यक्ष व श्री सोमेश्वर कारखाना संचालक संग्राम सोरटे यांनी दिले तर द्वितीय ३१ हजार रुपये बक्षीस रेणुका इंडस्ट्रीजचे चांगदेव धुर्वे ,२५ हजार चे बक्षीस विजय कोळपे व राजेंद्र भांडवलकर तर चतुर्थ क्रमांकास २१ हजार रुपये बक्षीस रामभाऊ हाके व भरत हगवणे यांनी दिले.
क्रिकेट सामन्यासाठी सूर्यकांत गायकवाड, निखिल भोसले, अनिल गायकवाड, मुकेश चौधरी, प्रदीप शेंडकर,अजय शेंडकर, धीरज गायकवाड , योगेश भिलारे ,राहुल निवृत्ती शेंडकर विशेष सौजन्य लाभले.
स्पर्धेचे संयोजक म्हणून भाऊसाहेब हुंबरे, जितू सकुंडे ,किरण शेंडकर ,पापा मुलाणी व शशिकांत जेधे होते तर प्रीमियर लीग पर्व चौथे चे आयोजक प्रणाली ग्रुप अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे व सोमेश्वर स्पोर्ट व सोशल क्लब यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा संपन्न झाली.

Releated Posts

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026