• Home
  • राजकीय
  • सोरटेवाडी ग्रामविकास पॅनेल सर्व जागांवर विजयी मात्र साजेशा विजयाला सुरुंग !
Image

सोरटेवाडी ग्रामविकास पॅनेल सर्व जागांवर विजयी मात्र साजेशा विजयाला सुरुंग !

प्रतिनीधी :

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक निकाल जाहीर झालेल्या बारामती तालुक्यातील १३ पैकी बहुसंख्य ग्रामपंचायतीत सत्तांतर झालेले दिसून आले. प्रस्थापितांच्या विरोधात लोकांनी विशेष करून तरुणांनी बदलाच्या दिशेने कल झुकवलेला दिसून आला. त्यामध्ये सोरटेवाडी ग्रामपंचायत सत्ताधारी सोरटेवाडी ग्रामविकास पॅनेलने सर्व ९ जागांसह *सरपंचपद* स्वतःकडे राखण्यात यश मिळवले आहे. मात्र काहीशाच मतांनी उमेदवार निवडून आल्याने अपवाद सोरटेवाडी ग्रामविकास पॅनेलचा उमेदवार *श्री.अमोल गंगाधर सोरटे* याने वॉर्ड क्रमांक १ मधून विक्रमी मताधिक्य घेऊन सर्वांच्या चेहऱ्यावर हास्याची लहर उमटविली . पॅनेलच्या सर्व प्रमुखांनी मात्र गुलाल , मिरवणुकी काढण्यास मनाई केली. सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या वेळीचे सत्ताधारी , विरोधक या सर्वांनी एकत्रित येत गावचा पॅनेल उभा केला असताना देखील विरोधी पॅनेलप्रमुख श्री . राजीव लक्ष्मण सोरटे यांनी सर्वच जागांवर विजयासाठी घाम फोडला . गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतांचे अर्धशतकही न फोडलेल्या राजीव सोरटे अवघ्या काहीशा मतांनी विरोधी उमेदवाराकडून सरपंदासाठी पराभव झालेला आहे. पराभवानंतर देखील पराजितांनी फटाके गुलाल उधळून आनंद साजरा केला हे विशेष !

Releated Posts

केंद्रात, राज्यात ‘ हिरो ‘ ; बारामतीत मात्र ‘ झिरो’….

प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त.. पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या व जवळपास विरोधी…

ByBymnewsmarathi Feb 11, 2026

राज्यात निवडणुकीचा धडाका! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला रणसंग्राम

प्रतिनिधी  राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज १२ जिल्हा…

ByBymnewsmarathi Jan 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा – प्रकृती कारणास्तव पदत्याग

प्रतिनिधी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2025