Home
राज्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि तक्रार नोंदविण्यासाठी आता १०४ टोल फ्री हेल्पलाईन*
प्रतिनिधी. पुणे दि. २६- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी आणि विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यात येत असून स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी तसेच शंकेचे निरसन करण्यासाठी १०४ ही टोल फ्री हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू करण्यात आली […]
वंचित बहुजन आघाडी बारामती तालुका अध्यक्ष रामदास जगताप यांची विस्तारीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त ….
प्रतिनिधी. वंचित बहुजन आघाडीच्या बारामती तालुका विस्तारित कार्यकारणी मध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे पुणे येथे नुकत्याच झालेल्या पक्ष संघटनेच्या मुलाखती मध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व जिल्हा अध्यक्ष राज यशवंत कुमार यांच्या आदेशान्वये रामदास जगताप यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या […]
आईच्या प्रियकराची मुलाने केली धुलाई
प्रतिनिधी घरी कुणी नसताना एका युवकाच्या आईचा प्रियकर भेटायला आला. आई व तिच्या प्रियकरात शाब्दिक वाद झाला. तेवढ्यात मुलगा घरी आला. त्याने आईच्या प्रियकराची यथेच्छ धुलाई केली. लोखंडी रॉडने हल्ला करून त्याचे डोके फोडले. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी तरुणास अटक केली आहे. निक्की (२०) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. […]
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थिनीवर जंगलात नेऊन बलात्कार
प्रतिनिधी ज्या स्कूलबसमधून मुलगी शाळेत जात होती, त्याच स्कूलबसवरील चालकाचा मित्र असलेल्या युवकाने दहाविच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला रात्रीच्या सुमारास जंगलात नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. श्याम उर्फ बिट्टू प्रशांत बेलखोडे (२४) रा. जलारामनगर, खरबी रोड, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडित १५ वर्षीय मुलगी ही दहावीची […]
तळीराम शिक्षक; मुख्याध्यापक, पालकांनी दिला चोप
प्रतिनिधी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेचे पुरते तीन तेरा वाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर जीवती तालुक्यातील आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक चक्क दारू ढोसून शाळेत प्रवेश केला. झिंगाट अवस्थेत दोघेही पालकांना दिसून आले. संतापलेल्या पालकांनी या दोघांना जाब विचारीत धारेवर धरले. तसेच शिक्षकासोबत आलेल्या एका तरुणाला […]
सेल कंपनीचे काम रोखणाऱ्या कामगारांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी कळंबोली येथील सेल कंपनीमध्ये कामगार आणि ठेकेदार यांच्यात मागील दोन महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. लोखंडी माल उचलण्यासाठी लोखंडी चुंबक (मायजॅक क्रेन) सेल कंपनीने आणल्याने माथाडी कामगारांचा याला विरोध आहे. मराठी कामगार सेनेच्या प्रतिनिधींसह या संघटनेच्या कामगारांनी बुधवारी सेल कंपनीतील मायजॅक क्रेनचे काम बंद करण्याचा पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी वारंवार सांगूनही कामगार व […]
पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या
प्रतिनिधी हातउसने घेतलेले पैसे परत न केल्याने शिवीगाळ करून त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडी भागात घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आजिनाथ सर्जेराव लोखंडे (वय ४२, रा. तळजाई पठार, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. लोखंडे यांना धमकावून आत्महत्येस प्रवृ्त केल्याप्रकरणी रामदास काशिनाथ त्र्यंबके (रा. बाभळगाव, ता. माढा, जि. […]
ठाण्यातील बांधकाम विकासक कौस्तुभ कळके यांना अटक
प्रतिनिधी ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे.जोशी एंटरप्रायझेस कंपनीतून दोन भागीदारांना बाहेर काढण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणुक केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक कौस्तुभ कळके यांच्यावर असून या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात नौपाडा पोलिसांनी कळके यांना शुक्रवारी अटक केली आहे. या प्रकरणातील दोन जण फरार असून पोलिस त्यांचा शोध […]
भिशीचे आमिष जळगावातील १३ महिलांना पडले महागात
प्रतिनिधी शहरातील १३ महिलांना भिशीचे आमिष दाखवत एका दाम्पत्याने तब्बल ५५ लाख २२ हजार २८० रुपयांना गंडवल्याची घटना उघड झाली आहे. भिशीसाठी पैसे गोळा करण्यासह सासर्याच्या उपचारासाठी पैसे उसनवार घेऊन दाम्पत्याने १३ महिलांची फसवणूक केली. सविता संजय सोळंखे व तिचा पती संजय धोंडू सोळंखे अशी संशयित दाम्पत्याची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पल्लवी ठोसर या शहरातील […]
भाईंदर मध्ये पोलीस पथकावर हल्ला, महिला पोलिसाला बांबूने बेदम मारहाण
प्रतिनिधी अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस पथकावर नशेबाजांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका महिला पोलिसाला लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली आहे, महिला पोलीस गंभीर जखमी झाली आहे. भाईंदर येथील धारावी परिसरात ही घटना घडली. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे सध्या अमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात येत आहे. दररोज नशेबाजांची धरपकड […]