Home
आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाखांचे चोरबिटी बियाणे जप्त
प्रतिनिधी मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे तीन वर्षांपासून रवीकुमार गोटेपट्टी (रेड्डी) हा आंध्रप्रदेशातून आलेला इसम परिसरातील शेतकऱ्यांना भुलथापा देऊन जमिनी भाडेतत्त्वावर घेणे, शेतात चोरबिटीचा वापर करीत असल्याची माहिती गुणनियंत्रक पथकाला मिळाली. पथकाने छापा टाकून ९ लाख ४८ हजार रुपये किमतीचे तब्बल पाच क्विंटल कापसाचे चोरबिटी बियाणे जप्त करून गुन्हा दाखल केला. या कारवाईने चोरबिटी बियाणांचा वापर […]
पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी
प्रतिनिधी कोरपना तालुक्यातील लोणी येथे मुलाने वयोवृद्ध आई-वडिलांना एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी वडिलांना कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आल्याचे कळते. मनोज पांडूरंग […]
भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर १५० पेक्षा जास्त जणांना विषबाधा
प्रतिनिधी आजकाल सर्वत्र वेगवेगळ्या देवांच्या नावांनी, वेगवेगळ्या कारणांनी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. भंडाऱ्यातील प्रसादरुपी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अशा ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दीही होत असते. या भंडाऱ्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याने काही वेळा भलतेच घडते. नंदुरबार जिल्ह्यातील रनाळा येथे असाच प्रकार घडला. ग्रामीण भागात बाळूमामा यांच्यावर श्रध्दा असणारे बहुसंख्य आहेत. रनाळे […]
डोक्यात विटा पडून ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी दहिसर पश्चिम येथे डोक्यात विटा पडून ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीच्या नूतनीकरणाचे काम घेतलेल्या कंपनीच्या मुकादमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्वाहनातून विटा घेऊन जात असताना त्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात पडल्या. पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दहिसर येथे वास्तव्यास असलेले शरद आंब्रे (६५) याच परिसरातील एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून गेली […]
मित्राची हत्या करून आरोपीचीही आत्महत्या
प्रतिनिधी कुर्ला काजुपाडा परिसरात गाळ्यामध्ये राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरूवात केली आहे. काजुपाडा परिसरातील घास कंपाऊंड येथील एका कपड्यांच्या गाळ्यामध्ये ही घटना घडली. आरोपी व मृत व्यक्ती दोघेही या गाळ्यामध्ये काम करतात. त्यांच्यात झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याचा कैचीने गळा […]
दिल्लीनंतर पुणे पोलिसांचा सांगलीत छापा, आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे मेफेड्रोन जप्त
प्रतिनिधी पुणे पोलिसांच्या गु्न्हे शाखेने दिल्लीनंतर सांगलीत छापे टाकून मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. दिल्लीत केलेल्या कारवाईत पोलिसांनी ९७० मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्लीतून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. दिवेश चिरंजीत भुटिया, संदीप राजपाल कुमार (दोघे रा. नवी दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे […]
आंध्र प्रदेशातून बारामतीला जाणारा एक कोटीचा गांजा साठा पकडला
प्रतिनिधी आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात बारामतीकडे होणारी गांजासारख्या अंमली पदार्थाची तस्करी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली. या कारवाईत ४५९ किलो ३४० ग्रॅम गांजा जप्त करून चौघाजणांना अटक करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे ही कारवाई करण्यात आली. आंध्र प्रदेशातील श्रीकुलम येथून गांजा वाहतूक करणारी मोटार सोलापूरमार्गे बारामतीकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती […]
बारामती ! (होळ) सस्तेवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. १९ फेबुरवारी रोजी (होळ) सस्तेवाडी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली . शिवशक्ती प्रतिष्ठान आयोजित शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १८ फेब्रुवारी रोजी शिवशक्ती प्रतिष्ठान च्या वतीने किल्ले पुरंदर येथून ज्योत आणण्यात आली व १९ फेब्रूवारीला ज्योत चे आगमन सस्तेवाडी मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले . १९ फेबुरवारी […]
सोमेश्वर नगर येथे डंपर व दुचाकीचा अपघात अपघातामध्ये महिला गंभीर जखमी.
प्रतिनिधी सोमेश्वर नगर इंजीनियरिंग कॉलेज समोर काही वेळापूर्वी डंपर व दुचाकी मध्ये अपघात होऊन एक महिला व एक मुलगा गंभीर जखमी झाल्याचे समजते. डंपर चालकाने जोराचा ब्रेक दाबल्यामुळे दुचाकी वरील महिला डंपरला धडकून हा अपघात झाला. यामध्ये महिलाव मुलगा गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने साई सेवा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे डंपर चालक […]
बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. १९ फेब्रुवारी रोजी वडगाव निंबाळकर मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली . जाणता राजा युवा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धा , लघुपट प्रदर्शनाच्या माध्यमातून प्राणी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्राण्यांच्या ओळख व्हावी म्हणून त्यांच्या जीवनमानात होत असलेल्या बदलाची माहिती लघुपटाच्या माध्यमातून दाखवण्यात […]