Home

1 min read

क्रिकेट पिचसाठी आणलेल्या सिमेंट पाईप खाली येऊन बालकाचा मृत्यू

प्रतिनिधी क्रिकेट खेळण्यासाठी गावाबाहेरच्या शेतात क्रिकेट पिच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंट पाईप खाली दबून दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. आर्यन जयेश चव्हाण (१०) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना पुसद तालुक्यातील वडसद येथे शनिवारी सायंकाळी घडली. वडसद येथे शेतामध्ये क्रिकेटची पीच तयार करण्यासाठी काही मुलांनी मोठा सिमेंटचा पाईप आणला. क्रिकेट पीच तयार करून पाईप […]

1 min read

नगर रस्त्यावर गांजा विक्री, उत्तर प्रदेशातील दोघांना अटक

प्रतिनिधी नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सागर कुमार (वय २३), शिवम सरोज (वय २२, दोघे मूळ रा. गोरीडी, संत बिरदास नगर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर भागातील नागपाल रस्त्यावर दोघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस […]

1 min read

विद्यापीठातील तोडफोड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निलंबित; तोडफोडीची माहिती वरिष्ठांना देण्यातील दिरंगाई भोवली

प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात तोडफोड करण्यात आल्यानंतर या घटनेची माहिती बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरीत न कळविल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. सचिन शंकर गाडेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे […]

1 min read

चार वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक

प्रतिनिधी कांदिवली पूर्व येथील शाळेतील सुरक्षा रक्षकाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याचे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. रुग्णालयात मुलीच्या तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ५५ वर्षीय सुरक्षा रक्षकाविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. चार वर्षांची मुलीच्या आईच्या […]

1 min read

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना ई-स्कुटरचे वाटप

प्रतिनिधी  पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् व ओमा फाऊंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे देण्यात आलेल्या १० ई-स्कुटरचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा […]

1 min read

बारामती ! वडगांव निंबाळकर येथे आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

प्रतिनिधी –  आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्या १९२ व्या पुण्यतिथीनिमित्त वडगांव निंबाळकर येथे अभिवादन करण्यात आले. उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. राजे उमाजी नाईक यांना ३ फेब्रुवारी १८३४ पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी […]

1 min read

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु.

प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत १० संवर्गातील पदांसाठी अंतरिम निवड व प्रतिक्षा याद्या आणि गुणवत्ता याद्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीने गतवर्षी २८ ऑगस्ट २०२३ […]

1 min read

सोमेश्वरच्या चेअरमन साहेबांच्या पीएकडे का असतो ऑन ड्युटी पिस्तूल? मोर्चादरम्यान अनेक शेतकऱ्यांमधून वेगवेगळ्या चर्चेला उधाण.

संपादक मधुकर बनसोडे.  सभासदांची ऊसतोड वेळेत होत नसल्यामुळे शनिवारी सोमेश्वर च्या चेअरमन, संचालकांच्या, विरोधात शेतकरी कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.  मात्र या मोर्चादरम्यान शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी बोलताना असे सांगितले की सोमेश्वर च्या चेअरमनने सभासदांचे खरंच भलं केलं असेल […]

1 min read

रावेतमध्ये निवासी शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संचालकासह माजी विद्यार्थिनी अटकेत

प्रतिनिधी रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमी या निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीवर संचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संचालक नौशाद अहमद शेख (वय ५८) आणि त्याला मदत करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. १६ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख हा रावेत येथे क्रिएटिव्ह ॲकॅडमी ही […]

1 min read

पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांसाठी पात्र माजी सैनिकांनी अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदाच्या भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी २६ जागा राखीव असून पात्र माजी सैनिकांनी या रिक्त पदांसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे. महानगरपालिकेकडील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात ९ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत मागील अनुशेषाच्या १३ आणि सध्याच्या जाहिरातीतील १३ जागा अशा […]