Home
बारामती ! कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी बारामती कृषी अधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन.
प्रतिनिधी – फिरोज भालदार महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनास सोमवार दिनांक ५ मे पासून सुरुवात केली असून यासंदर्भात त्यांनी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. कृषि विभाग कृषि सहाय्यक यांचे प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना धरणे आंदोलन बारामती जि. पुणे दिनांक ७ मे २०२५ बुधवार आंदोलनाचा […]
पुण्यातील मटका अड्ड्यावर कारवाई, कारागृहातून बाहेर पडताच पुन्हा मटका अड्डा; सराइतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा
प्रतिनिधी जुगार, मटका अड्डा चालविण्याचे ६३ गुन्हे दाखल असलेला सराईत नंदू उर्फ नंदकुमार नाईक याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. गृहविभागाने आठ दिवसांत ही कारवाई रद्द केल्यानंतर नागपूर कारागृहातून बाहेर पडलेला नंदू नाईकने पुन्हा मटका अड्डा सुरू केल्याचे उघडकीस आले. खडक पोलिसांनी मटका अड्ड्यावर कारवाई करून नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल […]
बारामती ! राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला तिहेरी मुकुट ; बारामतीच्या खेळाडूंनी मारली बाजी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार कर्नाटक राज्यात झालेल्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पुरुष संघाने अप्रतिम खेळ करत छत्तीसगड, गोवा, बिहार, कर्नाटक, पुदुचेरी सह अंतिम फेरीत हरीयाणाचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरून विजेतेपद प्राप्त करत सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच महाराष्ट्र महिला संघाने रौप्यपदक मिळवले असुन संमिश्र संघाने कास्यपदक पटकावत तिहेरी यश संपादन केले. या संघात खेळाडू […]
भिवंडीत ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त, ठाणे पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी भिवंडी येथे ३० लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केल्या आहेत. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुरज शेंडे (३२), भारत सासे (३८) आणि स्पप्नील पाटील (३८) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. भिवंडी येथील अवचितपाडा परिसरात काहीजण भारतीय बनावटीचे चलन घेऊन येणार […]
सोमेश्वर सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया,नेत्र तपासणी शिबारास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी सोमेश्वर सोमेश्वर सेवाभावी संस्था, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोफत नेत्र बिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी शिबीरात अनेक नेत्र रुग्णांनी तपासणी करून लाभ घेतला. शिबीराचे उद्घाटन पुणे. जि. परिषद माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोदकाका काकङे यांच्या शुभहस्ते व पुणे. जि. म.स.बॅक संचालक संभाजीनाना होळकर,लातूर जिल्हा क्रिङा अधिकारी जगन्नाथ लकङेसो […]
टोल नाक्याजवळ भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी, मालवाहू वाहनाची ट्रकला धडक
प्रतिनिधी गिट्टीखदानमधील टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याअतंर्गत नवीन काटोल नाकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला. टाटा एस या चारचाकी वाहन चालकाने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला. रोशन टेकाम (२५) रा. कळमेश्वर, रमेश देहनकर (५२) रा. ब्राम्हणवाडा […]
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग धोकादायक; २४ तासांत तीन अपघातांत तिघांचा मृत्यू
प्रतिनिधी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग, तसेच वडगाव उड्डाणपूल परिसरात २४ तासांत झालेल्या तीन अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला. भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली, तर दुपारी एकच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. शुक्रवारी सकाळी झालेल्या अन्य एका अपघातातही दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुपारी बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकने दोन दुचाकी, रिक्षा, […]
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी सात गावांतील २८०० हेक्टर जमीन संपादन प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुणे जिल्ह्यातील सात गावांतील सुमारे २,८३२ हेक्टर जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘विकास हवा, पण अन्याय नको’ अशी भूमिका घेत शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची तयारी करत आहेत. प्रकल्पासाठी खालील सात गावांतील जमीन संपादित होणार आहे: पारगाव मेमाणे, वणपुरी, उदाचिवाडी, कुंभारवळण, एकतपूर, […]
लोणंद नगरपंचायत येथे वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त.
प्रतिनिधी. पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी लोणंद नगरपंचायत येथे वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निषेध मोर्चा काढत भ्याड हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बापू ढावरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना. झालेला घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला . यावेळी निषेध व्यक्त करण्यासाठी. संस्थेचे खालील पदाधिकारी […]
आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी सोमेश्वर च्या चेअरमन संचालक मंडळाला जाग येणार का?
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये निलंबित केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी तारीख पे तारीख सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे प्रथमदर्शनी अहवालातून सिद्ध झाली मात्र अद्यापही सोमेश्वरच्या कारभाऱ्यांकडून दोषींवरती कोणतीही कायदेशीर कारवाई केल्याचे दिसत नाही. सोमेश्वरच्या चेअरमन संचालक मंडळा झोपेच सोंग घेऊन या प्रकरणांमधून नक्की कोणाला […]