Donot Miss
Latest Posts
Highlight
Popular News
राम,लक्ष्मण,सीता,हनुमान व राधाकृष्ण यांच्या मूर्तीची नींबूत मध्ये मिरवणूक मिरवणुकी दरम्यान मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळण.
प्रतिनिधी.. नींबूत गावात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या भव्य मूर्तींची भक्तिमय मिरवणूक झाली. मूर्ती प्रतिष्ठापनाच्या आदल्या दिवशी संपूर्ण गावभर नागरिक उपस्थित होते, प्रत्येक समाजातील व्यक्तींना ट्रॉलीत बसवून शोभायात्रेत सामील करण्यात आले. रस्त्यांवर रंगीबेरंगी रांगोळी सजवली होती, फुलांचा सुवास संपूर्ण परिसरात पसरला होता आणि जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय बनवले. या भक्तिमय मिरवणुकीत गावातील सर्व […]
सतीश भैय्या कल्याणकारी संघाने आयोजित केलेली आणि माननीय श्री सतीशराव शिवाजीराव काकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली संकल्प यात्रा 2025
प्रतिनिधी. काशी अयोध्या दिनांक 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान टप्प्याटप्प्याने पूर्ण झाली. त्यानिमित्ताने गंगा पूजन कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयच्या प्रांगणामध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमास माननीय सतीश भैय्या काकडे देशमुख( अध्यक्ष सतीश भैय्या कल्याणकारी संघ), माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय सविताताई काकडे देशमुख, सोमेश्वर सहकारी […]
सतिशभैया कल्याणकारी संघ निंबूत, आयोजित *होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमात* रविवार दिनांक 12 /10 /2025 रोजी निंबूत व परिसरातील तीनशे ते साडेतीनशे महिलांनी सहभाग घेतला. श्री .बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयाच्या प्रांगणात या खेळाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सविताताई काकडे देशमुख , सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्माननीय अभिजीत भैय्या काकडे देशमुख, निंबूत ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संचालिका सन्माननीय तेजस्विनीताई काकडे देशमुख शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस सन्माननीय मदन भैया काकडे देशमुख तसेच विविध महिला बचत गटाच्या संचालिका आणि एम चॅनेल चे प्रमुख वार्ताहर सन्माननीय मधुकर बनसोडे […]
महसूल सेवक आंदोलनाचा शासकीय सेवांवर परिणाम ; नागरिकांची होत आहे गैरसोय ” प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नागरिकांची मागणी.
प्रतिनिधी – महसूल सेवक पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय चतुर्थ वेतन श्रेणीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नागपूर येथील संविधान चौक येथे आमरण उपोषण सुरू झाले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामती तालुक्यातील सुमारे ३८ महसूल सेवक सहभागी झाले आहेत. महसूल सेवकांच्या आंदोलनाची आजपर्यंत शासकीय स्तरावर दखल घेण्यात आलेली नाही. गेल्या ६० वर्षापासून होत असलेली चतुर्थ […]
पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर
प्रतिनिधी. पुणे, दि.९: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रक्रिया पूर्ण करुन जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहूल सारंग, जि. प. […]
मेहरूण स्मशानभूमीत अमानवी अस्थिचोरी — “सोने नको, फक्त आईच्या अस्थी परत करा
प्रतिनिधी. जळगाव शहराजवळील मेहरूण परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, स्मशानभूमीतून वृद्ध महिलेच्या अस्थी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी भावनिक आवाहन करत म्हटले आहे — “आम्हाला सोने नको, फक्त आईच्या अस्थी परत करा.” गायत्रीनगर येथील छबाबाई काशिनाथ पाटील (वय. ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कारावेळी अंगावरील सोन्याचे दागिने न […]
सोमेश्वरच्या सभासदांच्या खात्यावरती अंतिम बिल जमा.
प्रतिनिधी. गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी कारखान्याकडे गळीतासाठी पुरविलेल्या ऊसाचे अंतिम बील रु.२२६/- प्रती टन प्रमाणे सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणेत आलेले आहे. त्याचप्रमाणे पुर्व हंगामी ऊसासाठी रु.७५/- व सुरु व खोडवा ऊसाकरीता रु.१५०/-प्र.टन याप्रमाणे अनुदानाची रक्कम सभासदांच्या खात्यावर यापुर्वीच जमा करणेत आलेली आहे. अनुदानाची रक्कम विचारात घेता कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना पुर्व हंगामी ऊसासाठी रु.३४७५/- […]
पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रमाचे
प्रतिनिधी. समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रमाचे १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता कवीवर्य मोरोपंत सभागृह, इंदापूर रोड, बारामती येथे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५ नुसार […]
ठाण्यात NCB ची धडक; ₹८ कोटींचा मेफेड्रोन जप्त
प्रतिनिधी राष्ट्रीय औषध नियंत्रण ब्युरो (NCB) ने ठाण्यात मोठ्या धडक कारवाईत ₹८ कोटींच्या मेफेड्रोन खेप जप्त केली आहे. ही कारवाई शहरातील संशयित व्यापार नेटवर्कवर लक्ष ठेवून करण्यात आली. आरोपी दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून काही मोबाईल फोन, सिमकार्ड आणि व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. NCB अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या खेपेमध्ये एकूण ४ […]
मुंबईतील कुरळा हॉस्पिटलवर वैद्यकीय दुर्लक्षाचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी मुंबईच्या कुरळा परिसरातील एका खासगी रुग्णालयावर वैद्यकीय दुर्लक्षाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीत डॉक्टरांकडून उपचारात निष्काळजीपणा झाल्याचे निदर्शनास आले असून, पोलिसांनी संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध दुर्लक्षामुळे मृत्यू (IPC कलम 304-A) या कलमान्वये गुन्हा नोंदवला […]
