• Home
  • सामाजिक
  • रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली
Image

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग

बारामती – वैद्यकिय,सामाजिक, शैक्षणिक,पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असणारे व नुकताच आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेले श्री.कृष्णमुर्ती जगताप यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा न करता स्वतः रक्तदान करून व पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना आदरांजली वाहुन गिरिजा ब्लड बँक,बारामती येथे रक्तदानाने साजरा केला.कोरोना काळात तसेच मागील वर्षी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात जवानांसाठी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता त्यावेळी जम्मु-काश्मिर येथे पैलवान चंद्रहार पाटील यांनी सैनिकांसाठी आयोजित केलेल्या सिंदूर महारक्तदान शिबिरात कृष्णमुर्ती जगताप यांनी जम्मु-काश्मिर येथे जाऊन रक्तदान केले.आजपर्यंत त्यांनी स्वतः एकवीस वेळा रक्तदान केले आहे.रक्तदान केल्याने चार रुग्णांचा जीव वाचत असल्यामुळे रक्तदानाचा हा संकल्प कायम ठेवणार तसेच रक्तदानाबाबत जनजागृती व रक्तदानाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांनी सांगितले.यावेळी ब्लड बँकेतील डाॅक्टर, नर्स,स्टाफ व मित्रमंडळी उपस्थित होते.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025