Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा बारामती मध्ये तीव्र निषेध
Image

नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा बारामती मध्ये तीव्र निषेध

प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या या हृदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) बारामती शाखेच्या वतीने भिगवण चौक येथे जोरदार निषेध आंदोलन करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

या घटनेने संपूर्ण समाजमन हेलावून गेले असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे” आणि “दोषींना तात्काळ फाशी द्या” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनादरम्यान आरोपीविरोधात तीव्र रोष व्यक्त करत प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा अमानवी आणि संतापजनक घटनांमुळे समाजातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महिलांवर आणि बालकांवर वाढणारे अत्याचार रोखण्यासाठी शासनाने ठोस आणि कडक उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे. संबंधित प्रकरणाची जलदगतीने चौकशी करून दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अन्यथा अभाविपतर्फे आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात प्रदेश सहमंत्री श्रावणी बाचल, जिल्हा सहसयोजक ओंकार तावरे, शहर सहमंत्री तन्मयी कोंढाळकर, शहर संपर्क प्रमुख पारस हवलदार, शहर कार्यकारणी सदस्य आदित्य गुरसुळकर, टीसी कॉलेज संपर्क प्रमुख ओम परकाळे, जयदीप सपकळ, धनराज बागल, तेजस डेरे, निखिल जाधव, प्रतीक पाटील, श्रुती त्यारे, किरण साळवे, दिक्षा लोंढे, सिमरन मुलाणी, रोहित नरुटे, ओम काटे, तन्मय काजळे, शुभम शेंडे, वैभव शेंडे, सिद्धार्थ रासकर, प्रथमेश गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नसरापूर येथील चिमुकली हत्याप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी भिगवण चौक, बारामती येथे अभाविपतर्फे करण्यात आलेले तीव्र निषेध आंदोलन.

Releated Posts

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026