दि.२ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; सर्व शासकीय सेवा सोमेश्वर मध्ये एकाच छताखाली होणार उपलब्ध.
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत बारामती विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे, श्री शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोमेश्वरनगर (ता. बारामती, जि. पुणे) येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, पुरवठा, ग्रामविकास, परिवहन (एस.टी.), पशुसंवर्धन, वन, महिला व बालकल्याण, महावितरण, आरटीओ, पोस्ट, भूमी अभिलेख तसेच विविध शासकीय विभागांच्या योजना व सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शिबिरात महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले, आधार कार्ड दुरुस्ती सेवा, एसटी महामंडळाचे NCMC कार्ड, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, कर्जमाफीसंदर्भातील प्रमाणीकरण, ई-पीक पाहणी अर्ज, विविध शासकीय योजनांचे अर्ज स्वीकारणे व लाभार्थींना मार्गदर्शन आदी सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचे तातडीने निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
या शिबिरासाठी मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय, बारामती यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेण्यात येत आहे
बारामती तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय, बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
