Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  • रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

प्रतिनिधी.
बारामती, दि. ३१ जुलै : कऱ्हाटी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या कथित बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात भारतीय युवा पँथर संघटना, महाराष्ट्र राज्यचे सचिव गणेश रामदास थोरात यांनी १५ ऑगस्ट २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती बारामती तसेच ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कऱ्हाटी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात गाव नकाशानुसार असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत रस्ता उपलब्ध करून दिला जात नाही आणि अतिक्रमणधारकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय  कऱ्हाटी येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, खासदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती सभापती तसेच संबंधित पोलीस प्रशासनालाही पाठविण्यात आल्या आहेत.
प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि अतिक्रमणाबाबत कोणती कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Releated Posts

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज  महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

कै. बाबालाल साहेबराव काकडे – देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026