महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
अक्षय थोरात:
महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात पकडून विनयभंगासारखे कृत्य करणे तसेच लग्न होऊ देणार नसल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७८, १२६(२), ११५(२), ३५१(२) व ३५१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी आर्यन मोहन कोकरे (रा. माळेगाव कारखाना, ता. बारामती, जि. पुणे) असून त्याचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ती व तिची मैत्रीण ABC या लाटे-बारामती एस.टी. बसने शारदानगर बसथांब्यावर उतरून शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाकडे पायी जात होत्या. त्यावेळी स्विट होम परिसरापासून आरोपीने त्यांचा पाठलाग सुरू केला.
तक्रारीनुसार, महाविद्यालयासमोरील देवी मंदिराजवळ आरोपीने स्कुटी आडवी लावत फिर्यादीस “मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू गाडीवर बस,” असे सांगितले. मात्र फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्या अंगावरील टॉप ओढून कानशिलात थप्पड मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पुन्हा स्कुटी आडवी लावून आरोपीने फिर्यादीचा डावा हात पकडत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच “तुला कोणाला सांगायचे ते सांग, तुझ्या वडिलांना घेऊन ये, मी तुझे लग्न होऊ देणार नाही. कॉलेजमध्ये जाऊ नकोस, नाहीतर मी आतमध्ये येईन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
फिर्यादी व तिची मैत्रीण महाविद्यालयात गेल्यानंतरही आरोपीने मोबाईलवर संपर्क साधत “तू कुठे आहेस ते सांग, नाहीतर सापडल्यावर मार खाशील,” अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार सय्यद (ब. नं. २२१३) करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हवालदार पटारे (ब. नं. १८४७) यांनी पूर्ण केली.
