मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Saturday, 17 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बारामती! कर्तव्याच्या वर्दीला बहिणींच्या मायेची साथ; वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा भावनिक सोहळा.

mnewsmarathi 02 Sep 2026 1 मिनिट वाचन 3,945 वाचन

प्रतिनिधी — फिरोज भालदार

रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे दिनांक २ सप्टेंबर रोजी महिलांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष सौ. ज्योतीताई लडकत तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. पूजा गणेश जगताप, सौ. मीना दशरथ जगताप, सौ. शोभा गोरख जगताप, सौ. राणी बजरंग जाधव व सौ. हेमा गणेश खोडके यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचा संदेश दिला.

पोलीस बांधव हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावत असतात. सण-उत्सव असो अथवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने रक्षाबंधनाचा हा उपक्रम घेण्यात आला असे उपस्थित महिलांकडून सांगण्यात आले

यावेळी महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बांधवांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये काही काळ आनंदाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित महिलांना पोलीस कर्मचाऱ्यांकडूनही सन्मानपूर्वक प्रतिसाद देण्यात आला.

या कार्यक्रमास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिपक वारुळे यांच्यासह वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचा संपूर्ण पोलीस स्टाफ उपस्थित होता. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस आणि नागरिकांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणारा हा उपक्रम ठरला.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi