मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 15 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मु.सा. काकडे महाविद्यालयात आविष्कार संशोधन स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 15, 2026 1 मिनिट वाचन 3,511 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी
सोमेश्वरनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच आविष्कार संशोधन स्पर्धा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आविष्कार संशोधन स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन मु.सा. काकडे महाविद्यालयमध्ये करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित व्हावी तसेच विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प तयार व्हावेत व असे संशोधन प्रकल्प समाज हितासाठी उपयोगी ठरावेत या उद्देशाने आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे असे प्रतिपादन अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसरचे प्रा. डॉ. किरण रणदिवे यांनी केले. प्रा. डॉ.किरण रणदिवे यांनी आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी प्रकल्प कसे तयार करावेत आणि प्रकल्पांचा पेटंट पर्यंतचा प्रवास कसा करावा याचबरोबर स्पर्धेविषयीच्या नियम व अटी यावर्षी सविस्तर मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आविष्कार संशोधन स्पर्धा समितीचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी आविष्कार संशोधन स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त बुद्धिमत्तेला वाव मिळतो तसेच त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि संशोधनात्मक विचारांना व्यासपीठ उपलब्ध होते असे मत मांडले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन केले. या कार्यशाळेत प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक,संशोधक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सदरच्या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डॉ. श्रीकांत घाडगे यांनी केले तर प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी आभार मानले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख