मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 24 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 24 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सोमेश्वरने स्विकारला राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा देशपातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 24, 2026 1 मिनिट वाचन 3,502 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

 श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली या संस्थेचा सन २०२४-२०२५ चा देशपातळीवरील ‘तांत्रिक कार्यक्षमतेचा’ तृतीय क्रमांकाचा पुरस्कार दिनांक २२/०९/२०२६ रोजी केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. सदर कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री कृष्ण पाल (गुर्जर), महाराष्ट्राचे सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील, माजी सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री तथा राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन पाटील तसेच झारखंड, गुजरात, पंजाब या राज्यांचे सहकार मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते.

देशभरातील सहकारी साखर कारखान्यांना नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमामध्ये पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक श्री. राजेंद्र यादव, वर्क्स मॅनेजर श्री. नारायण नायकवडे व चीफ केमिस्ट श्री. शिवशंकर भोसले यांनी हा पुरस्कार स्विकारला.

कारखान्यास देशपातळीवरील पारितोषिक मिळाल्यामुळे कारखान्याचे चेअरमन मा. श्री. पुरुषोत्तम रामराजे जगताप, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाने सर्वांचे अभिनंदन केले असून कारखान्याच्या सभासद वर्गातून पारितोषिक मिळाल्याबद्दल कौतुक केले जात आहे.

या पुरस्काराबद्दल बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. राजेंद्र यादव यांनी सांगितले की, दिवंगत लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील देशात नावारूपास आलेला व महाराष्ट्र राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय मा. ना. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या आपले श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा सन २०२४-२०२५ चा संपूर्ण देशभरातून तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार काल आपण स्विकारला असून संपूर्ण देशभरातून सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार गतवर्षी प्राप्त केल्यानंतर हा मानाचा दुसरा पुरस्कार आपल्या कारखान्याने यापर्वी मिळविला आहे.

आहे. या पुरस्काराचे खरे मानकरी कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी बांधव, कारखान्याचे चेअरमनसाहेब, व्हाईस चेअरमनसाहेब, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊसतोड वाहतूकदार, ऊसतोड मजूर तसेच सर्व हितचिंतक यांचे आहे असे मी नम्रपणे मानतो.

गेल्या ९३ वर्षात सर्वोच्च ऊसदर व विविध पुरस्कारांचा मानकरी ठरणारा श्री सोमेश्वर आपल्या सर्वांचा अभिमान आहे, तो कायम राहील यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. कारखान्यास सन २०१३ पासून विविध नामांकित संस्थांचे राज्य व देशपातळीवरील १३ पुरस्कार मिळाले असून कारखान्याच्या विकासाच्या व प्रगतीच्या कामकाजावर शिक्कामोर्तब झाले असून याचा आम्ही सर्वांना सार्थ अभिमान आहे. यापुढेही कामकाजातून कारखान्याची प्रगती व विकासाचा चढता आलेख कायम राहील असा विश्वास कार्यकारी संचालक श्री. राजेंद्र यादव यांनी व्यक्त केला.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख