मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 27 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 27 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

साहेबराव दादा विकास सोसायटीची ११५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 27, 2026 1 मिनिट वाचन 3,503 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

निंबुत : सन १९११ मध्ये स्थापन झालेल्या साहेबराव दादा विकास सोसायटीची ११५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

सभेपुढे ठेवण्यात आलेले एकूण नऊ विषय सभासदांनी सर्वानुमते मंजूर केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजितराव काकडे यांनी संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा मांडत संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांचे सहकार्य व मार्गदर्शन आवश्यक असल्याचे सांगितले.

सभेदरम्यान विविध विषयांवर सभासदांनी चर्चा केली. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन सभा शांततापूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सभेचे प्रास्ताविक राजकुमार बनसोडे यांनी केले. संस्थेचे सचिव योगेश काकडे यांनी सभेपुढील विषयांचे वाचन करून संस्थेच्या आगामी वाटचालीसंदर्भात माहिती दिली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख