मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 29 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

सोमेश्वरच्या चेअरमन निवडीचा मुहूर्त ठरला! ५ तारखेला फैसला;? पाच दिग्गजांच्या नावांची चर्चा

mnewsmarathi 29 Oct 2026 1 मिनिट वाचन 4,924 वाचन

 प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाच्या निवडीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. येत्या ५ तारखेला चेअरमनपदाची निवड निश्चित होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे कारखान्याच्या नव्या नेतृत्वाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत २१-० असा दणदणीत विजय मिळाल्याने सत्ताधारी गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले. आता कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, याकडे सभासदांसह राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

चेअरमनपदाच्या रेसमध्ये पाच दिग्गजांची नावे!

चेअरमनपदासाठी राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, अभिजीत काकडे, संग्राम सोरटे आणि सुनील भगत या नावांची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पाच नावांपैकी कोणाला संधी मिळणार, याबाबत सहकार क्षेत्रात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सुनेत्रा पवार कोणाच्या खांद्यावर सोपवणार कारभाराची धुरा?

२१-० अशा विजयामुळे सोमेश्वर कारखान्याच्या नेतृत्वाबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी आता महत्त्वाची ठरणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार सोमेश्वर कारखान्याच्या कारभाराची जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चर्चेत असलेल्या नावांपैकी कोणाला पसंती मिळते, यावर कारखान्याच्या आगामी नेतृत्वाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

५ तारखेला उत्सुकतेचा पडदा उठणार?

येत्या ५ तारखेला चेअरमनपदाची निवड होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत असली, तरी अधिकृत कार्यक्रमाची घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे निवडीच्या दिवशी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते आणि सोमेश्वर कारखान्याच्या कारभाराची सूत्रे कोणाच्या हाती जातात, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi