मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 6 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

बंगळुरू हादरले ! पत्नीसोबतच्या वादातून सासू-सासरे, मेहुणे, त्यांच्या बायकांना एकेक करून घरी बोलविले, सात जणांना वरवंटा डोक्यात घालून संपविले

mnewsmarathi 06 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,613 वाचन

प्रतिनिधी

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका धक्कादायक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. वैवाहिक वादाच्या रागातून ४५ वर्षीय कॅब चालकाने स्वतःच्या पत्नीसह तिच्या कुटुंबातील तब्बल ७ सदस्यांची निर्घृण हत्या केली आहे.

राजाजीनगर भागातील राहत्या घरी आरोपीने दोन दिवसांत एकेकाला बोलावून डोक्यात वरवंटा घालून हा भयानक हत्याकांड घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी राजाजीनगर पोलिसांनी आरोपी शेखर ऊर्फ इंदुशेखर (वय ४५) याला अटक केली आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये आरोपीची पत्नी सुनीता, सासू रूपावती, मेहुणे शिवकुमार व शंकर, सासूच्या सुना दिव्या व नलिनी आणि शिवकुमार यांचा अवघ्या ७ वर्षांचा मुलगा पुनीत यांचा समावेश आहे. यातील पुनीतचा मृतदेह चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स परिसराजवळ सापडला असून, उर्वरित मृतदेहांचा शोध पोलीस घेत आहेत.शेखर आणि सुनीता यांचा विवाह २० वर्षांपूर्वी झाला होता.

मात्र, गेल्या काही काळापासून दोघांमध्ये सातत्याने कौटुंबिक वाद सुरू होते. या वादात सुनीताच्या माहेरची मंडळी वारंवार मध्यस्थी करत होती आणि तिची बाजू घेत होती. सासरच्या लोकांच्या याच हस्तक्षेपाचा मनात राग धरून आरोपीने संपूर्ण कुटुंबालाच संपवण्याचा भयानक कट रचला.आरोपीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एकेकाला आपल्या राजाजीनगर येथील घरी बोलावले. सुरुवातीला त्याने पत्नी सुनीताचा खून केला. त्यानंतर सासू आणि इतर नातेवाइकांना बोलावून वरवंट्याने ठेचून त्यांची हत्या केली.

मेहुण्यांना त्याने पार्टी देण्याच्या बहाण्याने घरी आमंत्रित केले होते. दोन दिवसांत सात जणांची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ते चिक्कबळ्ळापूर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.नलिनी बेपत्ता झाल्याने तिच्या आईने श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तपासादरम्यान पोलिसांना शेखरच्या हालचालींवर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच या भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला. राजाजीनगर पोलीस आता उर्वरित मृतदेहांचा शोध घेत असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास करत आहेत..

लेखक

mnewsmarathi

M News Marathi