• Home
  • इतर
  • सोमेश्वरचे १२ लाख गाळप पूर्ण.-श्री.पुरुषोत्तम जगताप
Image

सोमेश्वरचे १२ लाख गाळप पूर्ण.-श्री.पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर १२ लाख ११ हजार मेट्रीक टनाचे गाळप पूर्ण केले असून सरासरी ११.६१ टक्के साखर उतारा राखत १४ लाख ३ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पातून ७ कोटी ९९ लाख ७ हजार ६७३ युनिटची वीजनिर्मिती केली असून ४ कोटी ३१ लाख ९७ हजार २१ युनिटची वीजविक्री केली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पातून ६७ लाख ५३ हजार ५१३ लिटर अल्कोहोल उत्पादन घेतले असून सोबत ३२ लाख २० हजार ५९२ लिटरचे इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे अशी माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

        श्री.जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कारखान्याकडे सभासदांचा व बिगर सभासदांचा नोंदलेला संपूर्ण ऊस तुटल्याशिवाय कारखान्याचा गाळप हंगाप बंद होणार नाही त्यामुळे सभासदांनी निश्चित राहावे असे आवाहन श्री.जगताप यांनी केले आहे. श्री.जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याच्या येत्या गाळप हंगामाकरता जाहीर झालेल्या लागण प्रोग्रॅममध्ये मुदतवाढ देण्यात आली असून यामध्ये ८६०३२, ८००५, १०००१, २६५,या जातीच्या रोप लागवडीस परवानगी देण्यात आली असुन ही परवानगी मार्च अखेर पर्यंत सुरू राहणार आहे. तरी सर्व सभासदांनी याचा लाभ घ्यावा असेही श्री.जगताप म्हणाले.

श्री.जगताप पुढे म्हणाले की, आगामी काळातील ऊसतोड मजुरांची घटणारी संख्या पाहता आपला सोमेश्वर कारखाना सभासदांना ऊसतोड करण्यासाठी हार्वेस्टर खरेदीसाठी कारखान्यामार्फत बिनव्याजी कर्ज योजना राबविण्याचा विचार आहे. याबाबत इच्छुक सभासदांनी शेतकी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री.जगताप यांनी केले आहे.
श्री.जगताप पुढे म्हणाले की, पुढील हंगामात मार्चच्या पुढे तुटणार्या ऊसाला अनुदान देण्याचा संचालक मंडळ विचार करीत असुन सभासद बांधवांनी खोडवा पिक राखावे व याचा लाभ घ्यावा.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025