प्रतिनिधी
सोमेश्वरनगर- येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात मुगुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक २३/०३/२०२३ ते २५/०३/२०२३ या कालावधीमध्ये साडी डे, टाय डे, मिसमॅच डे, ट्रॅडिशनल डे व स्पोर्ट्स डे यांचे आयोजन करण्यात आले होते. या तीनही दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून त्या सर्वच डेज चा आनंद घेतला. स्पोर्ट्सडे मध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी क्रिकेटच्या मॅचेस चे आयोजन करण्यात आले होते. या स्पोर्ट्स डे चे उद्घाटन पुना कॉलेजचे प्राचार्य डाॅ.शेख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे ही उपस्थित होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे पंधरा संघ सहभागी झाले होते. तसेच क्रिकेट बरोबर कबड्डी, खो-खो, व्हाॅलीबॉल याही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
२५/०३/२०२३ रोजी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या TDM या चित्रपटाच्या प्रोमो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे , मुगुट महोत्सवाचे समन्वयक प्रा. रवींद्र जगताप, चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
यावेळी TDM या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, यांनी चित्रपटाबद्दल माहिती सांगून चित्रपट कसा बनवला जातो. त्यामध्ये काय समस्या असतात. त्याची चित्रीकरण कसे केले जाते. याविषयी मार्गदर्शन केले व आपण या क्षेत्राकडे कसे आलो याचा जीवनपट त्यांनी उलघडून दाखवला. या चित्रपटाचा नायक पृथ्वीराज यांनी आपण ऑफिस बॉय ते अभिनेता कसा झालो या विषयी माहिती सांगितली. तर अभिनेत्री कालिंदी हिने आपण अभिनेत्री कशी झालो याविषयी माहिती सांगितली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या व शेवटी चित्रपटातील ‘एक फुल’ या गाण्यावर अभिनेता पृथ्वीराज व अभिनेत्री कालिंदी यांनी नृत्य सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रवीण ताटे- देशमुख यांनी केले तर आभार मुगुट महोत्सवाचे समन्वयक प्रा. रवींद्र जगताप यांनी मानले.
२७/०३/२०२३ रोजी फूड अँड फन फेस्टिवल या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या फेस्टिवलचे उद्घाटन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. अभिजीत भैय्या काकडे-देशमुख व व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. महेंद्रसिंह जाधवराव यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी या फेस्टिवलचे समन्वयक प्रा. डॉ. राहुल खरात यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, मुकुट महोत्सवाचे समन्वयक प्रा. रवींद्र जगताप, संस्थेचे सचिव सतीश लकडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या फेस्टिवल मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे जवळपास 35 स्टॉल्स लावले होते. व यातून विद्यार्थ्याला मार्केटिंगची शिकवण दिली गेली. या सर्व स्टॉल्सवर विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
२८/०३/२०२३ रोजी मुगुट महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. सविताताई काकडे- देशमुख यांच्या शुभहस्ते झाले यावेळी सौ.शितलताई चंद्रशेखर काकडे -देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे संस्थेचे सहसचिव सतीश लकडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सौ. सविताताई काकडे देशमुख यांनी मुगुट महोत्सवाचा आनंद घ्यावा व शेवटी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी मुगुट महोत्सवाचा आढावा घेऊन सर्वांनी महोत्सवाचा आनंद घ्यावा असे विचार मांडले. मुगुट महोत्सवाचे प्रमुख प्रा. रवींद्र जगताप यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे विचार त्यांनी मांडले. तर सूत्रसंचालन प्रा.जे. एन. खोमणे यांनी केले व आभार प्रा. रवींद्र होळकर यांनी मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळ्यामध्ये विविध फनी गेम्स या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये संगीत खुर्ची चा यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षिका यांनी आनंद घेतला. व त्यानंतर शेलापागोटा (फिश पॉइंट) हा कार्यक्रम संपन्न झाला.
२८/०३/२०२३ या दिवशी दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. सविताताई काकडे -देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य, मुगुट महोत्सवाचे समन्वयक, संस्थेचे सहसचिव श्री सतीश लकडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून मुगुट महोत्सवाचा आढावा घेतला. तर दंगल कार कवी नितीन चंदनशिवे यांनी कविता माझ्या जगण्याची आस असून मी कवितेला कशी सुरुवात केली ते कवितेच्या वाटचालीचा प्रवास सांगून यातून कवितेचे सादरीकरण केले. तसेच त्यांना दंगलकार ही पदवी कशी मिळाली व दंगल ही कविता कशी शब्दबद्ध केली याविषयी माहिती सांगितली. तसेच त्यांनी पांडुरंगा व तमाशा या कवितेचे सादरीकरण करून सर्वांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण ताटे- देशमुख यांनी केले तर आभार मुगुट महोत्सवाचे समन्वयक प्रा. रवींद्र जगताप यांनी मांडले.
२९/०३/२०२३ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख होते. यावेळी माजी विद्यार्थी व प्रसिद्ध उद्योजक आर. एन.(बापू) शिंदे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैया काकडे- देशमुख, प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सहसचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. जगन्नाथ साळवे प्रा.डॉ. प्रवीण ताटे- देशमुख प्रा.डॉ. जया कदम, IQAC समन्वयक प्रा.डॉ. संजू जाधव ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विशेष शैक्षणिक पदवी प्राप्त प्राध्यापकांचे सत्कार घेण्यात आले. तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. मुरूमकर यांनी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असावा असे नमूद केले. शेवटी नॅक साठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष यांनी समाजातील वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठीच या महाविद्यालयाची स्थापना झाली आहे. व पुणे जिल्ह्यातील एकमेव असे महाविद्यालय आहे की अल्प फी मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते व गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. असे उ्दगार त्यांनी काढले व मुगुट महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला तर मुगुट महोत्सवाचे समन्वयक यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. ए. एस. शिंदे यांनी मानले व शेवटी विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व विविध गुणदर्शन या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याचे समन्वयक प्रा.डाॅ.निलेश आढाव व प्रा.अच्युत शिंदे यांनी सुंदर नियोजन केले होते.