३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त मावळ्यांची राष्ट्रीय शिवजागर यात्रा.

Uncategorized

 प्रतिनिधी.
जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त मावळा जवान संघटनेच्या मावळ्यांच्या वतीने राष्ट्रीय शिवजागर यात्रा सुरू करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांना तोलामोलाची साथ देणाऱ्या वीर मावळ्यांचे वारसदार, शिवभक्त यात्रेत सहभागी झाले आहेत.


किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी स्थळावर नुकताच शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ च्या जयघोषात यात्रेला प्रारंभ झाला.

जेष्ठ शिवभक्त शंकरराव दांगट यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे पारंपारिक पुजन करून पुष्पहार करून मानवंदना देण्यात आली.
मावळा जवान संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष प्रदिप ढुके म्हणाले,


६ जुन १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. यास येत्या ६ जुन रोजी ३५० वर्षं पूर्ण होत आहेत. शिवरायांनी निर्माण केलेल्या पहिल्या स्वातंत्र्याचा ऐतिहासिक वारसा तळागाळापर्यंत पोहचवून शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यासाठी किल्ले रायगड ते राजगड ते किल्ले जिंजी ( तामिळनाडू) अशी यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

जेष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे,
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ.शितल मालुसरे व मावळा जवान संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाहक लालासाहेब पासलकर यांच्या हस्ते यात्रेचा भगवा ध्वज संघटनेचे अध्यक्ष रोहित नलावडे व संदीप ढेबे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी डॉ.शितल मालुसरे लिखीत नरवीर तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र रायबा मालुसरे जीवनचरित्राचे प्रकाशन जेष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ.मालुसरे म्हणाल्या,
सर्व समाजात राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी शिवजागर यात्रा महत्वाचे योगदान देणार आहे ‌



श्री. नलावडे म्हणाले, लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती छत्रपती शिवरायांनी केली.स्वराज्याच्या रक्षणासाठी भुमिपुत्रांना एका छताखाली आणुन परकियांची शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट केली. शिवरायांच्या कार्याचा मोठा वारसा महाराष्ट्रा प्रमाणे कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यात आहे.
शारदा दांगट, सुशिला भिमराव चव्हाण, सीमा पारगे, गोगावले, मनोज देशमुख, राहुल गायकवाड आदींसह महिला,शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ: पाचाड ( रायगड) येथे राजमाता जिजाऊ समाधी स्थळावर राष्ट्रीय शिवजागर यात्रेचे भगवा ध्वज सुपुर्द करताना दत्ताजी नलावडे, डॉ.शितल मालुसरे