• Home
  • इतर
  • मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या तीन पीएच.डी संशोधन केंद्रांना मान्यता
Image

मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या तीन पीएच.डी संशोधन केंद्रांना मान्यता

प्रतिनिधी.

सोमेश्वर नगर: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नामांकित असलेल्या महाविद्यालयांपैकी एक मु. सा. काकडे महाविद्यालयास मानव्यविज्ञान विद्याशाखेमधील इतिहास व मराठी तसेच वाणिज्य विद्याशाखेतील कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयातील पीएच.डी संशोधन केंद्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाली. या तीन संशोधन केंद्रांना मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे. या नवीन अभ्यासक्रमांच्या मान्यतेमुळे महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री सतीशराव काकडे देशमुख व महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री अभिजीतभैय्या काकडे देशमुख यांनी आनंद व्यक्त केला. यासंबंधी बोलताना श्री. सतीशराव काकडे यांनी अशी भावना व्यक्त केली की, “गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. या मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांच्या वतीने ग्रामीण भागातील उच्चशिक्षित तरुणांना पीएच.डी संशोधनाच्या संधी मु. सा. काकडे महाविद्यालयात उपलब्ध होतील. तसेच आम्ही सोमेश्वर परिसरातील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांच्या संधीदेखील उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्य शासनाच्या कौशल्य विकास महामंडळाच्या सहाय्याने, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत, तसेच विप्रा स्किल इंडिया या संस्थेच्या सहयोगाने पाच कौशल्याधिष्ठित शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले आहेत. यामध्ये फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, मेकअप आर्टिस्ट, ड्राट्समन मेकॅनिकल, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा रोजगाराभिमुख कोर्सेसचा समावेश आहे. हे सर्व कोर्सेस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.”


वरील संशोधन केंद्रास विद्यापीठाने मान्यता दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांनी विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री सतीशराव काकडे देशमुख व महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री अभिजीतभैया काकडे देशमुख यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे व महाविद्यालयाचा सर्व स्टाफ यांचे अभिनंदन केले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025