वडगाव निं.प्रतिनिधी- फिरोज भालदार
पंचायत समिती बारामती (शिक्षण विभाग) यांच्या सौजन्याने ” वडगाव निंबाळकरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ व २ मध्ये पहिल्याच शाळापूर्व तयारी मेळाव्यात इयत्ता पहिलीच्या ५० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला. अजून जूनमध्ये आणखी विद्यार्थी शाळेत दाखल होतील,असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
मुलांचे वजन,उंची मोजमाप
केले.शारीरिक,बौद्धिक,भावनिक,सामाजिक विकासाच्या नोंदी करून विकासपत्र व शाळेतील पहिले पाऊल पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले. नवीनच दाखल झालेल्या मुलांचे ढोल-ताशा,लेझीमचा गजर,रंगीबेरंगी फुगे,विविध शैक्षणिक साहित्याचे स्टॉलने स्वागत करण्यात आले.
या ”प्रवेशोत्सव व बालआनंद मेळाव्यासाठी” शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.राहुल जाधव आणि श्री.हनुमंत खोमणे,शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,कविता जाधव,सुरेखा मगदूम,अनिल गवळी,मालन बोडरे,विजया दगडे,सुनिता पवार,लता लोणकर,राणी ताकवले आणि मोठ्या संख्येने पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन गुणवत्ता व दर्जा सुधारल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुले दाखल झाल्याने मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बारामती तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.संपतराव गावडे साहेब,विस्ताराधिकारी हनुमंत कामथे,केंद्रप्रमुख हनुमंत चव्हाण,विषयतज्ञ सागर गायकवाड,संजय कारंडे यांनी मार्गदर्शन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक अनिल गवळी,प्रास्ताविक सौ.कविता जाधव मॅडम आणि आभार सौ.मालन बोडरे यांनी मानले.