बारामती शहर व परिसरात पोलिसांकडून लॉज चेकिंग

Uncategorized

प्रतिनिधी
बारामती शहर व परिसरामध्ये जोडप्यांना खोल्या काही तासासाठी भाड्याने दिल्या जातात. या कपलमध्ये बऱ्याच महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांचा सुद्धा समावेश आहे या प्रकारच्या तक्रारी माननीय अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी स्वतः व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक शहर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे

तसेच बारामती शहरकडील महिला व पुरुषांच्या स्टाफ च्या मदतीने बारामती शहरातील स्वागत लॉज महालक्ष्मी लॉज गंगासागर लॉज कॅप्टन लॉज या सर्व लॉजिस भर दुपारी चेक केल्या त्यामध्ये कुणी मिळून आले नाही परंतु सदर रजिस्टर मध्ये जुन्या नोंदी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर यशवंत लॉज या ठिकाणी सहा खोल्यांमध्ये काही महिला व तरुण हे मिळून आले त्यांच्या नातेसंबंधाबाबत त्यांना व्यवस्थित उत्तर देता आले नाही त्या लोकांना पोलीस ठाण्यात आणून अश्लील चाळे करण्यासाठी ते लॉज मध्ये आले होते लॉज सार्वजनिक जागा आहे त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 117 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे .माननीय न्यायालयात सदर बाबत खटला पाठवण्यात येईल.

तसेच यशवंत लॉजवर त्यांना परवानाच्या नियमाची भंग केला म्हणून म्हणून महाराष्ट्र पोलीस कायदा30 डब्ल्यू 131 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
परिसरातील सर्व लॉज चालकांची बैठक पोलीस ठाण्यात बोलून या प्रकारे अनधिकृत पणे महाविद्यालयातील युवक व युवती यांना खोल्या भाड्याने दिल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करून परवाना रद्द साठी सादर करण्यात येणार आहे.
लॉजवर येणाऱ्या जोडप्याने सुद्धा आपली बदनामी टाळायची असेल तर अशा पद्धतीने लॉजवर जाणे टाळावे.