मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 24 August 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती! वडगाव निंबाळकर येथे वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे उद्घाटन .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 24, 2023 1 मिनिट वाचन 8,512 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दि.23 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडी चे वडगाव निंबाळकर येथे शाखा उद्घाटन करण्यात आले . या शाखेचे आयोजन वंचित बहुजन आघाडी चे बारामती तालुका सचिव आर्यन साळवे यांच्या आयोजनाने करण्यात आले . यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार तसेच पुणे जिल्हा संपर्क प्रमुख ॲ.वैभव कांबळे , पुणे जिल्हा सचिव गोविंद कांबळे, बारामती तालुका अध्यक्ष रामदास जगताप, उपाध्यक्ष गणेश जाधव ,उपाध्यक्ष जितोबा खरात, बारामती तालुका संघटक गणेश थोरात, व दीपस्तंभ अकॅडमी संस्थापक अध्यक्ष शरीफ शेख हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वडगाव निंबाळकर शाखे च्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले . पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार साहेब यांनी यावेळी आपले मनोगत वक्त केले व नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष उपाधक्ष्य व सर्व सदस्य यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . या दरम्यान उपस्थितांचा व नवनिर्वाचित शाखा सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाखा आधक्ष्य असिफ शेख यांनी आपले मनोगत मांडताना माझ्यावर विश्वास ठेऊन मला हे पद दिले मी ह्या पदाचा चांगल्या कामासाठी व लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहील असे संबोधले .

यावेळी वडगाव निंबाळकर शाखेचे अध्यक्ष आसिफ शेख ,उपाध्यक्ष पै.अक्षय जाधव पै.अमीर बागवान, सचिव पै.विक्रम साळवे ,सचिव बंटी सोनवणे, सहसचिव विशाल गायकवाड ,महासचिव लखन भिसे ,खजिनदार गणेश रांगोळे पाटील , कार्याध्यक्ष धनंजय साळवे , प्रशांत खुडे ,संघटक साहिल बागवान गौरव खुडे , सहसंघटक मयूर अहिवळे, सल्लागार रोहन साळवे, संजय खुडे ,संपर्क प्रमुख विशाल साळवे ,मार्गदर्शक संतोष गायकवाड , अंकुश खुडे ,गणेश खुडे, प्रसिद्ध प्रमुख निहाल साळवे, सौरभ जगताप, सनी साळवे, आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमोल गायकवाड यांनी मानले .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख