माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये संविधान उद्देशिकेची विटंबना केल्याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी. महाराष्ट्र अध्यक्ष अमित बगाडे

Uncategorized

 संपादक मधुकर बनसोडे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका येथील माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये संविधान उद्देशिकेची विटंबना केली होता या उद्देशाने राष्ट्रीय संविधान अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट अनिल कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय संविधान अभियान संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमित बगाडे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले
यामध्ये अमित बगाडे यांनी सांगितले की भारतीय संविधान हे देशाचे हृदय आहे आणि या देशाच्या हृदयाला ठेच पोहोचवणे हे अत्यंत गांभीर्याची बाब आहे यापेक्षा गांभीर्याचे बाब असे आहे की चक्क पोलीस स्टेशन मधील पोलीस स्टेशन प्रभारी यांच्या प्रसाधन गृहामध्ये संविधान उद्देशिकाची विटंबना केली जाते. जर कोणताही अनोळखी इसम हा पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रभारी यांच्या प्रसाधनगृहामध्ये जात असेल तर यामध्ये नक्की कोणाच्या साह्याने कोणाच्या मदतीने गेला हे अद्याप या गुन्हा संदर्भामध्ये जो तपासे अधिकारी आहे त्यांनी अजून तो तपास पूर्ण केलेला नाही.?

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमित बगाडे यांची मागणी अशी आहे की संबंधित पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस जे अधिकारी व कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते त्यांची चौकशी करावी आणि संबंधित गुन्ह्याचा तपास ज्या अधिकाऱ्याकडे होता त्याचीही चौकशी करावी आणि जे जे अधिकारी व कर्मचारी ह्या गुन्ह्यामध्ये सामील आहेत त्यांच्यावरती सुद्धा महाराष्ट्र गौरव अपमान निवारण अधिनियम 1971 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे कारण जे अधिकारी व कर्मचारी संविधानाचा आदर करत नसतील तर ते सर्वसामान्य नागरिकांचा कधीही आदर करणार नाहीत.?

राष्ट्रीय संविधान अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट अनिल कुमार बागुल यांनी असे सांगितले की जर ही चौकशी तात्काळ चालू झाली नाही तर यांच्यावरती मुंबई हायकोर्ट व सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे यांच्याविरुद्ध याचिका दाखल करणार आहोत.
संबंधित प्रकरणांमध्ये तपासी अधिकारी यांच्याकडे माहिती मागण्याकरिता फोन केला असता संबंधित अधिकारी फोन नंबर ब्लैक लिस्ट ला टाकत आहेत. या प्रकरणांमध्ये नक्की कोणाला वाचवण्याचा तर प्रयत्न होत नाही ना अशी देखील चर्चा तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे?