• Home
  • माझा जिल्हा
  • मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Image

मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

प्रतिनिधी

मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने मानसिक नैराश्यातून एका चौदा वर्षांच्या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात मंगळवारी घडली. घरात कोणीही नसताना लोखंडी सळीला गळफास घेऊन तिने जीवन संपवले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून तिच्या पालकांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

मालवणी येथील खारोडी परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. या परिसरात मृत चौदा वर्षांची मुलगी तिच्या पालकांसह राहत होती. मंगळवारी सायंकाळी तिने तिच्या राहत्या घरातील लोखंडी सळीला गळफास लावून आत्महत्या केली होती. हा प्रकार तिच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत कांदिवलीतील जनकल्याणनगर, सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. सायंकाळी सव्वासात वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तिच्या पालकांची पोलिसांनी जबाब नोंदवून घेतली होती. या जबाबात या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. या पाळीचा तिला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने गळफास लावून आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026