*श्री.बाबालाल साहेबराव काकडे( देशमुख) विद्यालय निंबुत येथे नवीन विद्यार्थी स्वागत समारंभ व पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न*

Uncategorized

प्रतिनिधी.

निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे( देशमुख) विद्यालयात १५ जून रोजी नवीन विद्यार्थी स्वागत समारंभ व इयत्ता पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संस्थेच्या वतीने नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना जिलेबी चे गोड जेवण देण्यात आले.
या कार्यक्रमास निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा. श्री. भीमराव बनसोडे सर व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा. सौ. ज्योतीताई राजेंद्र लकडे उपस्थित होत्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेच्या सह शालेय उपक्रम अभ्यास पूरक उपक्रम विद्यार्थ्यांनी सहभागी होवून आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढं जाण्याबाबत विद्यार्थ्याना आवाहन केले.आणि नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. भीमराव बनसोडे सर यांनी शाळेतील पहिल्या दिवसाचे अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा व विद्यालयाची इयत्ता दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखावी असे आवाहन केले.संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या शिवाजीराव काकडे देशमुख व संस्थेचे मानद सचिव मा. श्री. मदनराव काकडे देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.