करंजे येथील सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप. 

माझा जिल्हा

 प्रतिनिधी

सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमेश्वर विध्यालय सोमेश्वरनगर भाग शाळा करंजे येथील होतकरू विध्यार्थी यांना (स्कूल-बॅग, कंपास, पेन,वह्या,टिपीन बॅग,पाणी बाॅटल) सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तमदादा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

          सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे,उधोजक संतोषराव कोंढाळकर,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी सुखदेवराव शिंदे यांनी करीत आसलेल्या समाजिक कार्याची माहीती दिली.

रक्तदान, नेत्र शिबीर , मोफत चष्मा वाटप, तसेच सामाजिक श्रेत्रात सुखदेवराव शिंदे यांचे मोलाचे सहकार्य आहे.

सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी देखील शाळेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मनोगत व्यक्त केले.

    सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तमदादा जगताप यांनी शाळेचा आढावा घेऊन उपस्थित मंङळी व विध्यार्थी वर्गाला संबोधित केले.

      यावेळी बोलताना चेअरमन साहेब यांनी कारखाना प्लॅन्ट मधून येणार्या वेस्टेज पाण्याचे शुध्दीकरण करून करंजेपूल शेजारील माळरानावर पाईप लाईन करून नेले आहे.

        फाॅरेस्ट खात्याच्या माळरानावर वृक्षारोपण करून त्या पाण्याचा उपयोग केला आहे. तसेच येणार्या काळात संपूर्ण माळरानावर वृक्षारोप करण्यात येणार आहे. तसेच उपस्थित मंङळींनी प्रतेकाने कारखाना प्रशासन यांना झाङे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले,जेणेकरून संपूर्ण माळरानावर वृक्षारोपण होईल. दहा हजार झाङे लावण्याचा मानस आहे.

           त्यामुळे सोमेश्वरनगर परिसराला निसर्गाचे वैभव प्राप्त होऊन, पर्यटक आकर्षित होतील.

करंजे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच भाऊसाहेब हूंबरे यांनी देखील वृक्षारोपण करण्याचे फायदे सांगितले.

      शालेय साहित्य वाटप केल्याने गरजू शाळेतील होतकरू विध्यार्थी यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

यावेळी सोमेश्वर संचालक प्रविण कांबळे , शशांक पवार सरपंच चौधरवाङी, मयुरी गायकवाड उपसरपंच ग्रामपंचायत करंजे,वैभव गायकवाड मा.सरपंच करंजेपूल, सुधीर गायकवाड,भरत हगवणे सामाजिक कार्यकर्ते मगरवाङी,तानाजीराव भापकर मा उपसरपंच चौधरवाङी,संताजीराव गायकवाड मा.उपसरपंच करंजे, राकेश (बंटी ) गायकवाड विभाग प्रमुख शिवसेना( उ. बा .ठाकरे ) बारामती,विष्णू दगडे ग्रा.सदस्य करंजे,अशोक होळकर ग्रा, सदस्य करंजे, विध्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.