श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाच्या वतीने श्री. संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे निंबुत गावामध्ये उत्साहात स्वागत…*

Uncategorized

निंबुत येथे दि. ५/७/२०२४ शुक्रवार रोजी श्री.संत सोपानकाका पालखी सोहळा ५.३० वा. मुक्कामी आला. यावेळी श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे सर, मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले.
यावेळी विद्यालयातील लेझीम पथकाने वाजत-गाजत पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळ्यामध्ये साक्षरतेचे महत्त्व पटवून देणारे घोषवाक्याचे फलक हातात घेऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साक्षरते विषयी जनजागृती केली. विद्यालयाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या मार्गात रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.
यावेळी ग्रामपंचायत निंबूत व तालुका प्रशासन तसेच आरोग्य विभाग यांच्या वतीने सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
तसेच महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी विनम्र व तत्पर सेवा देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी टाळ मृदंगाच्या तालावर, हातात भगवी पताका घेऊन,ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात अवघे निंबुत गाव भक्तिमय झाले होते. यानंतर निंबुत गावात पालखी सोहळा मुक्कामी विसावला .