प्रतिनिधी –
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत वडगाव निंबाळकर येथील ‘गायत्री बचत गट’ येथे भेट दिली. गायत्री बचत गटाबद्दल माहिती घेतली तसेच माल विक्री , उत्पादन विक्री साखळी , माल प्रक्रिया, ब्रॅण्डिंग व पॅकेजिंग, व्यवसायात येणारे अडथळे याविषयी देखील माहिती घेतली .
त्यांना विविध योजनाचे व व्यवसायांविषयी कृषिकान्यानी मार्गदर्शन केले .साक्षी कोते ,नेहा पाटील ,अदिती माने,नेहा पडवळ, दिक्षा मोरे , ज्ञानेश्वरी खळदकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्र पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश नलावडे, प्राचार्या प्रा. जया तिवारी, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलकंठ जंजिरे, कार्यक्रम अधिकारी डॉ .पल्लवी देवकाते, डॉ. मयुर पिसाळ ,प्रा.शिवानी देसाई, प्रा.अभिषेक गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.