• Home
  • क्राईम
  • लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणारे चोरटे गजाआड
Image

लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणारे चोरटे गजाआड

प्रतिनिधी

लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणाऱ्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी वारजे परिसरात एका दुचाकीस्वाराल धमकावून त्याला लुटल्याचे तपासात उघडकीस आले.

याप्रकरणी कासीम आसिफ अन्सारी (वय २२, रा. मोमीनपूरा, गंज पेठ), अनिकेत अनिल फासगे (वय २२ रा. गंज पेठ), आश्रफ गौस सय्यद (वय २०, रा. म्हाडा वसाहत, वैदुवाडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुण सदाशिव पेठेत राहायला आहे. १२ ऑगस्ट रोजी तो दुचाकीवरुन मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लक्ष्मी रस्त्याने निघाला होता. सेवासदन शाळेसमोर आरोपी अन्सारी, फासगे, सय्यद आणि साथीदार दुचाकीवरून आले. त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला अडवले.

अंगावर थुंकला का ? अशी विचारणा करून तरणाला धमकावले, तसेच त्याला धक्काबुक्की करून गळ्यातील सोनसाखळी चोरून चोरून नेली. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपास पथकाने लक्ष्मी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. आरोपी बुधवार पेठेतील क्रांती चौक परिसरात थांबल्याची महिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपींना सापळा लावून ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, मयूर भोसले, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, सातप्पा पाटील, संतोष शेरखाने, सागर मोरे यांनी ही कारवाई केली.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026