• Home
  • क्राईम
  • खेड शिवापूर टोलनाका परिसरात एक कोटींचा गुटखा जप्त, कर्नाटकातील गुटख्याची पुण्यात विक्री
Image

खेड शिवापूर टोलनाका परिसरात एक कोटींचा गुटखा जप्त, कर्नाटकातील गुटख्याची पुण्यात विक्री

प्रतिनिधी

शहरात गुटख्याची राजरोस विक्री होत असून, ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खेड शिवापूर टोलनाका परिसरात कर्नाटकातून पुण्यात विक्रीस पाठविलेला एक कोटी १५ लाख ८८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकासह दोघांना अटक केली.

मल्लमा भिमाया दौडमनी (वय ३१, सध्या रा. कात्रज, मूळ, रा. मदगुनकी कर्नाटक), तुषार दीपक घोरपडे (वय २६, रा. जांभुळवाडी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नवे आहेत. त्यांचे साथीदार स्वप्रील भालशंकर, बबलु पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अक्षय सुभाष नलावडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका परिसरातील शिवरे गावाजवळ ही कारवाई करण्यात आली.

राज्यात गुटखा, पानमसाल, सुगंधित तंबाखू विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. शहर, तसेच परिसरातून छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री होत आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीस पाठविण्यात येत आहे. बाह्यवळण मार्गावरुन गुटखा वाहतूक करणारा ट्रक निघाल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास शिवरे गावाजवळ सापळा लावण्यात आला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली. टेम्पोतून एक कोटी १५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. टेम्पोचालकासह साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत पुण्यातील आरोपींचे साथीदार बबलू भालशंकर आणि स्वप्नील पाटील यांच्याकडे गुटख्याचा साठा सोपविण्यात येणार होता असल्याची माहिती तपासात मिळाली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी आणि पथकाने ही कारवाई केली.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026