• Home
  • माझा जिल्हा
  • पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
Image

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी

प्रतिनिधी

पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड परिसरात दोन एसटी बसचा अपघात झाला. अपघातात महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. एसटी बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नामदेव बाबुराव आढाव (वय ७८, रा. चिंचपूर, आष्टी, जि. बीड ), सुवर्णा संतोष होले (वय ३८, रा. बिरोबावाडी, पाटस, ता. दौंड) अशी मृत्युुमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड परिसरात सोमवारी सायंकाळी अपघात झाला.

पुण्याहून सोलापूरकडे एसटी बस निघाली होती. त्यावेळी एक दुचाकीस्वार अचानक आडवा आल्याने एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले. बस दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या तुळजापूर-पुणे मार्गावरील एसटी बसवर आदळली. अपघातात दोन्ही बसमधील चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले. बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गु्न्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026