• Home
  • क्राईम
  • कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
Image

कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक

प्रतिनिधी

तुमचे कुरिअर आले असून त्यासाठी दहा रुपये ‘गुगल पे’वर पाठवा, असे सांगत सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखाची फसवणूक केल्याची घटना दापोडी येथे घडली. प्रा. जयंत हरीभाऊ सावरकर (वय ५८, रा. सीएमई, दापोडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजमल खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सावरकर हे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शर्मा नावाच्या व्यक्तीने दूरध्वनी केला. तुम्हाला तुमचे कुरियर हवे असेल तर श्री. ट्रॅक कोन कुरीयर दिल्ली या कंपनीला ‘गुगल पे’ वरुन दहा रुपये पाठविण्यास सांगितले. ’गुगल पे’ ओपन केल्यानंतर मोबाइलचे सुरुवातीचे पाच अंक टाईप करा’ असे सांगितले. त्यावर सावरकर यांनी मोबाईलचे सुरुवातीचे पाच अंक टाईप केले. त्यानंतर शर्मा याने, मी आता माझ्या कुरियर वाल्यांना सांगतो की, तुमचे कुरियर पाठविण्याची प्रक्रिया करा. त्यानंतर सावरकर यांना एक दूरध्वनी आला की तुमच्या सोबत काहीतरी फसवणूक होत आहे.

ते त्यांच्या दापोडी सीएमई येथील एसबीआय बँकेच्या शाखेत गेले. त्यांनी विचारपूस केली असता त्यांच्या खात्यातून हतीनापूर बारपेटा (आसाम) येथील कॅनरा बँकमध्ये अजमल खान नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर ९१ हजार ४६९ तसेच धामारायका राय (तामिळनाडू) येथील कॅनरा बँकेमध्ये अजमल खान नावाच्याच व्यक्तीच्या खात्यावर ८ हजार ४९९ रुपये असे एकूण ९९ हजार ९६८ ट्रान्सफर करून सावरकर यांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे तपास करीत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026