मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 9 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

सोमेश्वरच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील एकाही आरोपी वरती 15 मार्च संपला तरी गुन्हा दाखल नाहीच.

mnewsmarathi 16 Mar 2025 1 मिनिट वाचन 9,903 वाचन

संपादक मधुकर बनसोडे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या टाईम ऑफिस, लेबर ऑफिसर यांच्यावरती कारखान्याच्या चेअरमन संचालक मंडळाने निलंबनाची कारवाई करून त्वरित गुन्हे दाखल करू असे अश्वस्थ केले होते. मध्यंतरीच्या काही दिवसांमध्ये 15 मार्चपर्यंत पूर्ण चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातील अशा दबक्या आवाजातील चर्चा सुरू होत्या मात्र अद्यापही एका व्यक्ती वरती सुद्धा कारखाना प्रशासनाकडून गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणांमध्ये काही गौड बंगाल तर होत नाही? ना अशा चर्चा सभासदांमधून केल्या जात आहे या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये चेअरमन संचालक मंडळ गुन्हे दाखल केव्हा करणार याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणांमधून कुणालातरी सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासन एवढा वेळ घेत आहे का? असा देखील प्रश्न सभासदांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. सोमेश्वर वरती असे गैरप्रकार टाळण्याकरिता चेअरमन संचालक मंडळाने त्वरित जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून योग्य ती शिक्षा त्यांना मिळवूनच द्यावी म्हणजे भविष्यात कोणताही अधिकारी कर्मचारी आपल्या नोकरीशी गद्दारी करणार नाही.
तसेच पारदर्शकता कारभारामध्ये यावी याकरिता सभासदांच्या मागणीनुसार कारखान्याच्या सिव्हिल विभागाची देखील स्वतंत्र चौकशी करावी. खरंच सोमेश्वर कारखान्याचा कारभार हा पारदर्शक असेल तर सभासदांच्या मनामधील शंकेचे निरसन करण्याकरिता कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ सिव्हिल विभागाची चौकशी करणार का?
कारखान्याच्या सिव्हिल विभागांमध्ये देखील मोठा आर्थिक गैरप्रकार झालेला असू शकतो?अशा दबक्या आवाजामध्ये सभासदांमधून चर्चा होत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi