मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 19 August 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

जबरी चोरीच्या सराईत टोळीवर वडगाव निंबाळकर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 19, 2026 1 मिनिट वाचन 8,585 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.
चार जण अटकेत; दोन मोटारसायकलींसह सोन्याचे दागिने असा ११.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त
बारामती : वडगाव निंबाळकर पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत मोठी कारवाई केली असून, सराईत जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन मोटारसायकली आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तपासातून जबरी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले असून, आणखी एका गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानाडवाडी येथे शेतीत काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ व कानातील दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढला.
तपासादरम्यान आरोपींनी यवत, जेजुरी, बारामती शहर, वालचंदनगर, फलटण शहर आणि लोणंद परिसरात जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून चोरी केलेले दागिने हस्तगत करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राज मिथुन शिंदे (रा. राजाळे, ता. फलटण), सनि रमण भोसले (रा. राजकुम बंगला, सांगवी, ता. फलटण), बापुराव भानुदास चोपडे (रा. राजाळे, ता. फलटण) आणि प्रविण ज्ञानेश्वर वेदपाठक (रा. मारवाडपेठ, फलटण) यांचा समावेश आहे. तर पवन सॅन्डल काळे (रा. मांगोबामाळ, विडणी, ता. फलटण) हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या टोळीविरोधात वडगाव निंबाळकर, जेजुरी, वालचंदनगर, यवत, बारामती शहर, फलटण शहर आणि लोणंद पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले जबरी चोरीचे गुन्हे तपासात निष्पन्न झाले आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि वडगाव निंबाळकरचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.
या कारवाईत पोलीस हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, आबा जाधव, नरेंद्र यादव, धनंजय भोसले, हृदयनाथ देवकर, सुरज धोत्रे, भाऊसाहेब मारकड आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते करीत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख