Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  • १९ मोटारसायकलींच्या चोरीचा पर्दाफाश; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई;.
Image

१९ मोटारसायकलींच्या चोरीचा पर्दाफाश; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई;.

प्रतिनिधी.

संशयिताकडून १९ दुचाकी हस्तगत, तब्बल १९ गुन्हे उघडकीसबारामती :

बारामती शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बारामती पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून सुमारे ३० लाख रुपये किमतीच्या तब्बल १९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे १९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
बारामती : बारामती शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बारामती पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून सुमारे ३० लाख रुपये किमतीच्या तब्बल १९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे १९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
बारामती शहर व तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी पेट्रोलिंग, वाहन तपासणी तसेच संशयित व्यक्तींची चौकशी सुरू केली होती. याचदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक संशयित चोरीची मोटारसायकल घेऊन मेडिकल कॉलेज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे नाव समाधान बाबू काके (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्याने बारामती परिसरासह इतर ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याचे समोर आले. त्याने चोरी केलेल्या वाहनांवर महाराष्ट्र पोलिस, महाराष्ट्र वनसेवा तसेच एसटी महामंडळाचे स्टिकर लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत पोलिसांनी MH 42 BK 8003, MH 42 AV 2222, MH 42 BK 0464, MH 42 BK 9709, MH 42 BD 9490, MH 42 AT 4585, MH 42 AZ 0374, MH 42 AZ 1266, MH 42 AB 2222, MH 42 TG 2570, MH 42 AV 5869, MH 42 UQ 0303 तसेच MH 42 EA 2276 यासह एकूण १९ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
या कारवाईमुळे बारामती शहर व बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेले एकूण १९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या वाहनांची किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले असून, वाहनधारकांमध्येही काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Releated Posts

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना: अनुदानासह ४,०००/- रुपये प्रति मे.टन सर्वोच्च अंतिम ऊसदर जाहीर

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२०२६ गळप हंगामाकरिता अनुदानासह प्रति मे.टन ४,०००/-…

ByBymnewsmarathi Aug 14, 2026

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; कृषिमंत्री भरणे मामांना निवेदन

सासवड : नियमित व वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, या प्रमुख…

ByBymnewsmarathi Aug 13, 2026

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026