• Home
  • माझा जिल्हा
  • छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निंबुत येथे मोठ्या उत्साहात संपन्न.
Image

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निंबुत येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सकाळी आठ वाजता निंबूत येथे पारंपारिक पद्धतीने पार पडली.
यावेळी निंबूत गावातील तरुणांनी पुरंदर किल्ल्यावरून ज्योत आणली आणलेल्या ज्योतीचे ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करीत संपूर्ण गावांमधून ज्योत फिरवण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास शेतकरी कृती समितीचे नेते श्री सतीश राव काकडे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी नींबूत गावातील तरुण वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026