• Home
  • ताज्या बातम्या
  • निरा केंद्रात काकडे विद्यालयाचा प्रथम क्रमांक; दहावीचा शंभर टक्के निकाल

निरा केंद्रात काकडे विद्यालयाचा प्रथम क्रमांक; दहावीचा शंभर टक्के निकाल

पुरंदर प्रतिनिधी.
पिंपरे खुर्द, ता. पुरंदर : निंबूत ग्राम विकास प्रतिष्ठान, निंबूत संचलित श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय, पिंपरे खुर्द या विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदाही घवघवीत यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच निरा केंद्रात विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यालयातील कु. अदिती अमरनाथ अहिरेकर हिने ८७.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. आर्या संदीप गायकवाड हिने ८५.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर चि. फहाद फारुख शेख याने ८४.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
याशिवाय ५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नेवसे कैलास यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “संस्थापक अध्यक्ष श्री सतीशभैय्या काकडे देशमुख यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हावे, असे स्वप्न पाहिले आहे. आजचा निकाल त्या स्वप्नपूर्तीचा आनंद देणारा आहे.”
संस्थेचे अध्यक्ष श्री सतीशभैय्या काकडे देशमुख, उपाध्यक्ष सौ. सुप्रियाताई पाटील, मानद सचिव श्री मदनराव काकडे देशमुख तसेच ज्येष्ठ संचालक भिमराव बनसोडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना श्री विकास पवार, श्री अमोल शिंदे, सौ. पूजा काटकर, सौ. पल्लवी भापकर तसेच श्री शिवाजी काकडे शिक्षकेतर कर्मचारीयांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Releated Posts

निंबुत ग्रामपंचायत साठी वार्डनुसार आरक्षण सोडत जाहीर. पहा कसे असेल आरक्षण

प्रतिनिधी. नींबूत ग्रामपंचायतचे आज सकाळी 10 वाजता जी झाले गणपती मंदिर येथे वार्डनुसार आरक्षण सोडत झाली. या आरक्षण…

ByBymnewsmarathi Jun 12, 2026

इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचविण्यासाठी जलसंपदा विभागाला तातडीच्या सूचना

सहसंपादक अक्षय थोरात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण दाबाने व नियमित स्वरूपात उपलब्ध व्हावे, यासाठी भारतीय…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

खांडज येथे बेंदचारी.चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

प्रतिनिधी अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत अभ्यासवर्गात ओंकार तावरे यांना नवी दायित्वे

प्रतिनिधी. दि. ५, ते ८ जून २०२६ रोजी शिर्डी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पश्चिम महाराष्ट्र प्रांत अभ्यासवर्ग…

ByBymnewsmarathi Jun 9, 2026